Inauguration of Jabalpur – Indore – Jabalpur and Indore Gwalior – Indore flights
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या हस्ते, जबलपूर – इंदूर – जबलपूर आणि इंदूर ग्वाल्हेर – इंदूर विमानसेवेचे उद्घाटन
अलायन्स एअर द्वारे, या मार्गांवर आठवड्यातून तीनदा सेवा उपलब्ध
नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक मंत्री, ज्योतिरादित्य सिंधिया आणि राज्यमंत्री जनरल विजय कुमार सिंह (निवृत्त) यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत आज जबलपूर – इंदूर – जबलपूर आणि इंदूर ग्वाल्हेर – इंदूर फ्लाइट मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.
या विमानसेवा खालील वेळापत्रकाप्रमाणे चालणार आहेत:
या वाढीव हवाई वाहतूक संपर्कामुळे राज्यातील पर्यटन, व्यापार आणि इतर आर्थिक घडामोडींना चालना मिळेल. यामुळे या भागातील लोकांच्या राहणीमानातही सुधारणा होईल.
या उद्घाटन समारंभात बोलतांना, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, मध्य प्रदेशातील तीन प्रमुख शहरे एकाच दिवशी हवाई मार्गाने जोडली जात आहेत ही आनंदाची बाब आहे.नागरी विमान वाहतूक मंत्रालय या शहरांना त्यांच्या विकास क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यास वाव देत आहे, असं ते म्हणाले. या शहरांमध्ये सुरू असलेले पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रकल्पनियोजित वेळेत पूर्ण केले जातील, असे आश्वासन सिंधीया यांनी यावेळी दिले.
नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल विजय कुमार सिंग (निवृत्त) यांनी इंदूर, ग्वाल्हेर आणि जबलपूरच्या जनतेचे अभिनंदन केले. वाढत्या हवाई वाहतूक सुविधांनी लोकांच्या आकांक्षांना पंख दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला, खासदार विवेक शेजवलकर, मध्यप्रदेशातील मंत्री, प्रद्युमन सिंह तोमर, . तुलसी सिलवट, खासदार शंकर लालवाणी राकेश सिंग, विवेक तांखा उपस्थित होते. तसेच,नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव उषा पाध्ये, एआयएएचचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम देव दत्त, अलायन्स एअरचे मुख्य कार्यकारी अधिकरी विनीत सूद आणि MoCA चे इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com