सिकलसेल अनेमिया आजारा साठी आयुर्वेदिक औषधाची निर्मिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Development of Ayurvedic Medicine for Sickle Cell Anemia Disease by ‘Design Innovation Center’ of the University

सिकलसेल अनेमिया आजारा साठी विद्यापीठाच्या ‘डिजाइन इनोवेशन सेंटर’ कडून आयुर्वेदिक औषधाची निर्मिती

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातल्या प्राध्यापक डॉक्टर पूजा दोशी व त्यांचे विद्यार्थी नितीन कदम, युवराज काळे यांनी संशोधन करून डिजाइन इनोवेशन सेंटरच्या माध्यमातून ‘हिमआधार’ या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात आली.Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रिसर्च पार्क फाउंडेशन’च्या माध्यमातून या आयुर्वेदिक औषधाचे उद्घाटन व व्यावसायीकरण संबंधित माहिती जाहीर करण्यात येणार आहे.

इनोवेशन इन मेडिकल, फार्मास्युटिकल अँड अलाईड सायन्सेस फॉर कमर्शिअलायझेशन ऑफ टेक्नलॉजी (इम्पॅक्ट २.०) या कार्यक्रमात या औषधाबाबतची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक डॉ. अरविंद शालिग्राम यांनी दिली. हा कार्यक्रम विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळात घेण्यात येणार आहे.

‘हिमआधार’ हे औषध सिकलसेल अनेमिया आजारा साठी आणि रक्तवर्धक,रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, रक्तशुद्धी करण्यासाठी उपयोगी असल्याचे रिसर्च पार्क फाऊंडेशनकडून सांगण्यात येत आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “सिकलसेल अनेमिया आजारा साठी आयुर्वेदिक औषधाची निर्मिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *