PM Modi calls for giving a boost to the One District One Product scheme & further developing Aspirational Districts
पंतप्रधान मोदींनी एक जिल्हा एक उत्पादन योजनेला चालना देण्याचे आणि आकांक्षी जिल्ह्यांचा अधिक विकास करण्याचे आवाहन केले
विकसित भारताचं लक्ष्य अमृत काळात गाठण्याच्या कामात अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली : विकसित भारताचं लक्ष्य अमृत काळात गाठण्याच्या कामात अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं सहायक सचिव कार्यक्रमाच्या समारोपाच्या सत्रात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या २०२० च्या तुकडीला संबोधीत करत होते.
ते म्हणाले की, अमृत काल दरम्यान विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यात अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. श्री. मोदी म्हणाले की, अधिकाऱ्यांना अमृतकाळात देशसेवा करण्याची आणि पंचप्राण साकार करण्याची संधी मिळाली.
अधिकाऱ्यांनी काम करत असताना चौकटी बाहेर जाऊन विचार करण, तसंच समग्र दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. नव्या कल्पनांचं महत्त्व मोदी यांनी विशद केलं.
नवोन्मेष हा सामूहिक प्रयत्न आणि देशाच्या कार्य संस्कृतीचा भाग कसा झाला आहे, याबद्दलही ते बोलले. अधिकाऱ्यांनी एक जिल्हा एक उत्पादन या संकल्पनेवर भर द्यावा आणि आपल्या जिल्ह्यांमधून उत्पादनं निर्यात करण्याच्या संधी शोधून काढाव्यात असं ते म्हणाले. महत्वाकांक्षी जिल्हा उपक्रमासाठी आपला कृती कार्यक्रम तयार करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
त्यांनी स्टार्ट-अप इंडिया योजनेबद्दल आणि गेल्या काही वर्षांत देशातील स्टार्टअपच्या संख्येत कशी लक्षणीय वाढ झाली आहे याबद्दल सांगितले.
राज्यकारभाराचे लक्ष दिल्लीबाहेर देशाच्या सर्व क्षेत्रांकडे कसे वळले आहे, याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. महत्त्वाच्या योजना आता दिल्लीबाहेरून सुरू झाल्याची उदाहरणे त्यांनी दिली.
पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना एक जिल्हा एक उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यास आणि त्यांच्या जिल्ह्यातील उत्पादनांच्या निर्यातीच्या संधी शोधण्यास सांगितले. त्यांनी अधिकाऱ्यांना आकांक्षी जिल्हा कार्यक्रमासाठी कृती आराखडा तयार करण्यास सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com