Students studying in remote areas under adverse conditions are the real Savitri’s Lekki – Sandeep Khardekar
दुर्गम भागात विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी खऱ्या सावित्रीच्या लेकी – संदीप खर्डेकर
सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देऊन विद्यार्थिनींना मदत करण्याचा निर्धार – विशाल भेलके
हिर्डोशी येथील समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट प्रदान
पुणे : दुर्गम भागात विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी ह्या खऱ्या सावित्रीच्या लेकी असून सुमारे 25 किमी अंतरावरून रोज पायपीट करणारे विद्यार्थी देशाचे भविष्य असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण परिसरातील दुर्गम भागातील हिर्डोशी येथील समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने ट्रॅक सूट भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष व उपक्रमाचे संयोजक विशाल भेलके, उमेश भेलके,संदीप मोकाटे,अक्षय मोरे,विनोद मोहिते,सुरेश जपे, अजित जगताप,अनिकेत कामठे,गोविंद थरकुडे, जयदीप पडवळ, अजय भुवड, किरण उभे, रमेश उभे, विराज डाखवे, मोहित भेलके,यांच्यासह शाळेचे शिक्षक राजेशीर्के, श्री.सुभाष भेलके व हिर्डोशी चे सरपंच बाळासाहेब मालुसरे इ उपस्थित होते.
सकाळी 6 वाजता घर सोडल्यावर रात्री 9 वाजता घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो, या विद्यार्थ्यांनी खूप प्रगती करावी व देशाच्या उभारणीत योगदान द्यावे असेही संदीप खर्डेकर म्हणाले, तसेच तुम्हाला अजून काय मदत लागेल ते सांगा आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू व तुम्हाला उच्च शिक्षणासाठी देखील मदत करू असेही खर्डेकर म्हणाले.
ह्या वर्षी कोथरूड नवरात्र महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा दिला असून गरजुंना मदतीचा संकल्प सोडल्याचे कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके म्हणाले.ह्या दुर्गम भागात निर्मनुष्य रस्त्यावर करवंद विकणाऱ्या मुली बघितल्या आणि डोळे पाणावले आणि ह्या मुलींना मदत करावी असा निर्धार केल्याचे ही विशाल भेलके म्हणाले.म्हणूनच शिक्षकांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना थंडीपासून बचावासाठी ट्रकसूट देण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.
यावेळी शाळेच्या वतीने शिंदेशाही पगडी, शाल, श्रीफळ देऊन संदीप खर्डेकर आणि विशाल भेलके यांचा सत्कार करण्यात आला.आम्हाला शाळेसाठी मुलांना जाण्यायेण्या साठी एक मिनिबस, मल्लखांब चे साहित्य व एक पावसापासून संरक्षणासाठी शेड बांधून हवी असल्याचे शाळेचे शिक्षक सुभाष भेलके म्हणाले.
शक्य ती सर्व मदत वेळोवेळी करण्याचे वचन विशाल भेलके यांनी दिले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com