The World Bank warns that the global economy is on the brink of a major economic recession
जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा जागतिक बँकेचा इशारा
जागतिक अनिश्चिततेच्या स्थितीत भारत आशेचा किरण असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं प्रतिपादन
वॉशिंग्टन : जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. जागतिक बँकेने २०२३ चा जागतिक आर्थिक विकास दर ३ टक्क्यांवरून १ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला.
ही घसरण तीव्र जागतिक आर्थिक मंदी येणार असल्याचं सुचित करते असं जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड माल्पस यांनी सांगितलं. ते वॉशिंग्टन इथं जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने वार्ताहरांशी बोलत होते.
महागाई, व्याजदरात झालेली वाढ आणि विकसनशील देशांकडे भांडवलाचा प्रवाह कमी होणे या सर्व समस्यांचा गरिबांना मोठा फटका बसला आहे. माल्पस म्हणाले की आम्ही विकसनशील देशांमध्ये लोकांना पुढे जाण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
काही देश आधीच त्यांचे व्याजदर वाढवत आहेत आणि कदाचित अशा टप्प्यावर पोहोचले आहेत जिथे त्यांना ते वाढवत राहण्याची गरज नाही.
या समस्या जागतिक बँकेसमोर मोठे आव्हान असंल्याचंही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की देशातील गरीब लोकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना आवश्यक ती मदत करण्यावर भर देणं गरजेचं आहे.
जागतिक अनिश्चिततेच्या स्थितीत भारत आशेचा किरण असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं प्रतिपादन
जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेने आपला विकास वेग कायम राखला असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं आहे. या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारत हा आशेचा किरण असल्याचे गौरवोद्गार आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी काढले.
वॉशिंग्टनमध्ये आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलत होत्या.जी-ट्वेंटी देशाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याच्या काही दिवसांपूर्वी भारताकडून असलेल्या अपेक्षांवर विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.त्या म्हणाल्या, सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताचा विकास हा संरचनात्मक सुधारणांवर आधारित आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com