डिजीटल व्यवहारांमध्ये भारत जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे

Union Finance Minister Nirmala Sitharaman हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

India is making its mark globally in digital transactions – Nirmala Sitharaman

डिजीटल व्यवहारांमध्ये भारत जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे -निर्मला सीतारमन

भारतातील 5 जी ​​तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी – निर्मला सीतारामन

भारतातील आर्थिक धोरणं जगात जागतिक मानकं स्थापित करत आहे

वॉशिंग्टन: डिजीटल व्यवहारांमध्ये भारत जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे असं प्रतिपादन केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल अमेरिकेतील

Union Finance Minister Nirmala Sitharaman हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

वॉशिंग्टनमधील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात केलं. ‘तंत्रज्ञान, अर्थ आणि प्रशासन: विविध स्तरावरील प्रभाव’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांना जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतातील आर्थिक स्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आले. जी 20 देशांच्या अर्थमंत्र्याच्या बैठका आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकातील गव्हर्नरर्स तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीसाठी सीतारमन सध्या अमेरीका दौऱ्यावर आहेत.

आगामी काळातील भौगोलिक आणि आर्थिक अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी भारत सक्षम असल्याची भावना देशवासियांमध्ये असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारतातील आर्थिक धोरणं जगात जागतिक मानकं स्थापित करत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन शाश्वत मार्गावर असून संभाव्य जागतिक मंदीच्या काळातही ते स्थिर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री मोदींनी २०१४ नंतर सुरु केलेल्या डिजीटायझेशनच्या धोरणामुळे काही काळ भीतीचं वातावरण होतं. पंरतु तंत्रज्ञानाच्या वापरानं भारतात सुशासन साधलं जात आहे आणि डिजिटलायझेशनची क्षमता वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेतेत एक विशिष्ट परिवर्तन घडून येत असल्याचंही त्या म्हणाल्या.

भारतातील 5 जी ​​तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी

भारतातील 5 जी ​​तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टनमधील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सीतारामन यांनी ही माहिती दिली.

त्या म्हणाल्या की, भारत आता इतर देशांच्या आवश्यकतेनुसार कोणत्याही देशाला 5 जी तंत्रज्ञान देऊ शकतो.भारताचे 5-जी इतर कुठल्याही राष्ट्राकडून आयात केले नसून, ते भारताचे स्वतःचे उत्पादन असल्याचं त्यांनी सांगितलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *