राज्यातल्या 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर

Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

The results of the general elections of 1 thousand 79 gram panchayats in the state have been declared

राज्यातल्या 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर

मुंबई : राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यात भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्याचं दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बातमीदारांसी बोलताना सांगितलं. या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान झालं.Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

राज्य निवडणूक आयोगानं 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातल्या काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे काल प्रत्यक्षात 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं.

भंडाऱ्यातल्या 19 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतीत महिला सरपंच निवडून आल्या आहेत. 9 ग्रामपंचायतींवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. कॉंग्रेसनं पाच तर शिवसेनेच्या शिंदे गटानं तीन जागा मिळवल्या आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

रायगड जिल्ह्यातल्या १६ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून बहुतेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसल्याचं चित्र आहे. अलिबाग तालुक्यात वेश्वी, तसंच नवेदर नवगाव या ग्रामपंचायतींमध्ये शेकापचा पराभव झाला आहे.शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या मुळगावी म्हणजे खरवली येथे त्यांचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. तिथं महाविकास आघाडीचे चैतन्य महामूनकर विजयी झाले.

नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड विधानसभा क्षेत्रातल्या एकूण 14 ग्रामपंचायतींपैकी 8, तर रामटेक विधानसभा क्षेत्रातल्या 3 पैकी 2 ग्रामपंचायती अशा एकूण 17 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायतींवर सरपंचपदी भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *