ललित कला केंद्रातर्फे निर्गुण के गुण या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

Nirgun Ke Gun’ musical program organized by Lalit Kala Kendra

ललित कला केंद्रातर्फे निर्गुण के गुण या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र, गुरुकुल, भीमसेन जोशी अध्यासन आणि भारतीय लोककला अभ्यास, संशोधन व कल्याण केंद्राद्वारे निर्गुण के गुण या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.Savitribai Phule Pune University

या कार्यक्रमात पं. कुमार गंधर्व, विदुषी वीणा सहस्रबुद्धे तसेच पं. काशिनाथ बोडस यांनी संगीतबद्ध केलेल्या निर्गुणी भजनांपैकी काही अनवट रचनांचे सादरीकरण ललित कला केंद्राचे माजी विद्यार्थी पुष्कर लेले आणि रंजनी रामचंद्रन करणार असून कार्यक्रमाचे निरूपण व हार्मोनियम साथ चैतन्य कुंटे करणार आहेत, तर तबल्याची साथ श्रुतींद्र कातगडे यांची असणार आहे.

या कार्यक्रमाची निर्मिती भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खास करण्यात आलेली आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता नामदेव सभागृह, विद्यापीठ परिसर येथे होणार असून सर्व संगीत रसिकांसाठी मुक्त प्रवेश आहे अशी माहिती ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ.प्रवीण भोळे यांनी दिली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *