पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने २५० कोटी रुपयांच्या निधी वितरणाचे निर्देश.

Dy CM Ajit Pawar

राज्यात पर्यटनविकासासाठी २५० कोटींचा निधी वितरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश.Maharashtra Tourism Development Corporation

  • राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पर्यटनविकासासाठी प्रायोगिक तत्वावर दहा ‘जिल्हा पर्यटन अधिकारी’

  •  

राज्यातील महाबळेश्वर, एकविरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. राज्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासही त्यांनी मान्यता दिली. जिल्ह्यातील पर्यटनविकासात खाजगी संस्थांना सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यांमध्ये पर्यटन सोसायटी स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

Dy CM Ajit Pawar
राज्यातील पर्यटनविकासाच्या प्रकल्पांचा आढावा आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

राज्यातील पर्यटनविकासाच्या प्रकल्पांचा आढावा आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाने कालच राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पर्यटनविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 25 टक्के निधी टप्प्याटप्याने वितरित करण्याबरोबरच पर्यटनविकासाची शंभर टक्के पूर्ण झालेल्या कामांची 72 कोटींची देयके अदा करण्यात यावीत. जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची प्रायोगिक तत्वावर आणि कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करताना ॲग्रो टुरीझमच्या क्षेत्रात कार्यरत तज्ञांचा विचार व्हावा, असेही ठरविण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *