सामाजिक, आर्थिक पर्यावरण बदलण्यासाठी आवश्यक संशोधनाबाबत आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा

Nitin Gadkari, Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

IIT students should take the lead in the research needed to change the socio-economic environment – Nitin Gadkari

सामाजिक, आर्थिक पर्यावरण बदलण्यासाठी आवश्यक संशोधनाबाबत आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा – नितीन गडकरी

देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू ओळखून त्यांच्यासाठी स्वदेशी पर्याय विकसित करण्यावर भर देणे गरजेचे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

“मागास जिल्ह्यांच्या उन्नतीसाठी वन -आधारित उद्योग, कृषी आणि ग्रामीण तंत्रज्ञान, आदिवासी क्षेत्रावरील संशोधनाला प्राधान्य द्या”

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आयआयटीच्या संशोधकांना बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि बायो-मासपासून ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीसाठी जैव-तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांचे संशोधन केंद्रित करण्याचे आवाहन केले. ग्रीन हायड्रोजनचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, असे ते म्हणाले.

Nitin Gadkari- Hadapsar News
File Photo

आयआयटीचे विद्यार्थी सामाजिक, आर्थिक पर्यावरण बदलू शकतात, त्यासाठी आवश्यक असलेल्या संशोधनाबाबत त्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रिय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

ते मुंबई आयआयटीतल्या शैलेश जे मेहता व्यवस्थापकीय महाविद्यालयात आयोजित अलंकार २०२२ या वार्षिक व्यवसाय महोत्सवात बोलत होते. आपण कशाची आयात करतो हे पाहून त्यावर पर्याय शोधण्यासाठी संशोधन केलं तर त्याचा खूप फायदा होईल.

त्यांनी आयआयटीच्या संशोधकांना या जिल्ह्यांमधील वन-आधारित उद्योग, कृषी आणि ग्रामीण तंत्रज्ञान, आदिवासी क्षेत्र यांना संशोधनात प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “आपल्याला क्रांती घडवून आणण्याची क्षमता असलेला ग्रामीण, कृषी संबंधी आवश्यक कच्चा माल ओळखण्याची गरज आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील”, असे ते म्हणाले.

पेट्रोल-डिझेलला हद्दपार करण्याचा अवघड संकल्प आपल्यासमोर असून ऊर्जेचा तुटवडा ही सगळ्यात मोठी समस्या असल्याचं त्यांनी सांगितलं. ई-हायवे बनवण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी तुमची मदत हवी आहे. त्यावर संशोधन करुन त्याला प्रोत्साहन द्या, असं आवाहनही त्यांनी यावेळी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना केलं. इ-बस नंतर आता पुढच्या महिन्यात इ-ट्रक आणणार असल्याचं ते म्हणाले.

आगामी काळात आपण ऊर्जा निर्यातदार देश बनले पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी मोठे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले.

आयआयटीमधून बाहेर पडणा-या अनेकांनी सुरू केलेल्या स्टार्ट-अप कंपन्या यशस्वी होत आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. खेडेगाव, गरीब, कामगार आणि शेतकरी यांच्या उन्नतीसाठी युवा प्रतिभावंतांनी त्यांच्या संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

“देशातील गरिबी, उपासमारी आणि बेरोजगारी संपवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम करावे , कारण ते देशाच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनासाठी लाभदायक ठरणार आहे. प्रामाणिकपणा, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता हे 21 व्या शतकातील सर्वात मोठे भांडवल आहे.

नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न करा. – नोकरी करणारे नाही, ” असा सल्ला केंद्रीय मंत्र्यांनी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना दिला. 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीविषयी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, उद्योजकता, यशस्वी तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांसह ज्ञान हे यशाचे मर्म आहे.

यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा.सुभाशीष चौधरी आणि संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *