राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा

Swabhimani Shetkari Sanghatana leader and former MP Raju Shetty स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Make all the sugar mills weighing scales in the state online immediately – Raju Shetty

राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा – राजू शेट्टी

मुंबई : राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा, अशा मागणीच निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वैधमापन नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांना दिलं. Swabhimani Shetkari Sanghatana leader and former MP Raju Shetty स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

राज्यात यंदाचा उसाचा गळीत हंगाम सुरू झाला असून अनेक साखर कारखान्यांकडून उसाचं वजन करताना फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी या निवेदनात केला आहे. या बाबत शेट्टी यांनी सिंघल यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

राज्यातील साखर कारखान्यांचे सर्व वजन काटे ऑनलाईन करून वजन काट्यांचे कॅलिब्रेशनमध्ये पारदर्शक आणून संगणक प्रणाली एकच ठेवावी, तसेच त्यांचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैद्यमापन विभागाकडूनच व्हावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याने शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याची तक्रार शेट्टी यांनी यावेळी केली.

स्वाभिमानीकडून 7 नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर संकुलवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी सिंघल यांची मुंबईत भेट घेत चर्चा केली. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड मोठी लूट सुरू आहे.

त्यानुसार साखर कारखान्यांचे वजनकाटे, संगणकीय प्रणाली एकत्र करून तातडीने ऑनलाईन करण्याचे निर्देश सिंघल यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *