महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्यपालांनी घेतली आंतरराज्य समन्वय बैठक

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari and Karnataka Governor Thawarchand Gehlot held inter-state coordination meeting महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी घेतली आंतरराज्य समन्वय बैठक हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

Governors of Maharashtra and Karnataka held an inter-state coordination meeting with 9 District Collectors of border areas

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्यपालांनी सीमा भागातील्या ९ जिल्हाधिकाऱ्यांसह घेतली आंतरराज्य समन्वय बैठक

सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय

कोल्हापूर: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज सीमा भागातील नऊ जिल्हाधिकाऱ्यांसह कोल्हापूर इथं विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेली आंतरराज्य समन्वय बैठक आयोजित केली होती. Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari and Karnataka Governor Thawarchand Gehlot held inter-state coordination meeting
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी घेतली आंतरराज्य समन्वय बैठक 
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

अलमट्टी धरणाच्या उंची सकट सीमावरती जिल्ह्यात सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होत आहे महाराष्ट्रातील पाच तर कर्नाटकातील चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तीन विभागीय आयुक्त या बैठकीत सहभागी झाले आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर करणाऱ्या अलमट्टी धरणाचा पाणीसाठा नियंत्रण आणि संभाव्य उंची वाढवण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली.

गोवा राज्यातून अवैध दारू वाहतूक होऊ नये यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागाने शिनोली, संकेश्वर, कोगनोळी अंतर्गत मार्गांवर वाहनांची कसून तपासणी करुन अवैध दारू वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी एकमेकांशी समन्वय साधणे आवश्यक आहे

कर्नाटकातून हत्तीचे स्थलांतर आणि मानव-प्राणी संघर्षात झालेली वाढ, विद्यार्थ्यांना नॅशनल मिन्स स्कॉलरशिप मिळण्याबाबत, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचा कोविड आजारामुळे कर्नाटक राज्यात मृत्यू झालेला आहे अशा नागरिकांना भरपाई मिळणे तसेच सीमावर्ती भागात पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी ची मागणी श्री रेखावर यांनी केली. पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी कर्नाटक राज्यातील पोलीस विभागाशी समन्वय चांगला असल्याचे सांगितले.

यावेळी दोन्ही राज्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणावर मराठी व कन्नड भाषिक सामान्य नागरिक धार्मिक, पर्यटन, रोजगार, आरोग्य व अन्य कारणासाठी ये-जा करत असतात त्यांना दिशादर्शक फलक हे दोन्ही भाषेत( मराठी व कन्नड) करण्याबाबत समन्वय बैठकीत एकमत झाले.

अनेक सामाईक मुद्द्यावर दोन्ही बाजूने चर्चा होऊन त्यातील काही मुद्याबाबत बैठकीतच एकमताने निर्णय झाले. तर काही मुद्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठरले. तर राज्यस्तरावरील मुद्यांबाबत दोन्ही राज्यपाल संबंधित राज्य शासनाला सदरील प्रश्न सोडवण्याबाबत सूचित करणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावरती भागातील जिल्ह्यातील विविध प्रश्नांवरही या बैठकीत चर्चा झाली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *