शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळे प्रकल्प राज्याबाहेर

NCP Leader Ajit Pawar Hadapsar Latest News Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

Ajit Pawar’s criticism that due to the failure of the Shinde-Fadnavis government, the project has gone out of the state

शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची अजित पवार यांची टीका

  • जोपर्यंत १४५ चा आकडा शिंदे सरकारकडे आहे, तोपर्यंत हे सरकार चालेल
  • सरकारच्या अपयशामुळेचं प्रकल्प राज्याबाहेर गेले
  • हे सरकार फक्त घोषणा करत आहे

शिर्डी: शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळेचं प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. शिर्डी इथं आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मंथन: वेध भविष्याचा हे शिबिर होत असून या शिबीरासाठी अजित पवार शिर्डीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर टीका केली.

NCP Leader Ajit Pawar Hadapsar Latest News Hadapsar News हडपसर मराठी बातम्या
File Photo

हे सरकार फक्त घोषणा करत आहे. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांना मदत करेल, असं वाटत नाही, असं पवार यावेळी म्हणाले.

दीड-दीड लाख मुला मुलींना रोजगार मिळणार होते, असे प्रकल्प बाहेर गेले आहेत. चार लाख कोटी एवढी गुंतवणूक राज्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले होते. मात्र, आता महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प गेला हे धांदात खोटं बोलत आहेत.” आम्ही नवीन प्रकल्प आणून भरती करणार आहोत. जर प्रकल्प येणार असतील तर त्यांची यादी दाखवा, असे आवाहन

सध्या देशात आणि राज्यात बेरोगजारी वाढत आहे. गेल्या महिन्याचा सर्वे बघितला तर समजेल की बेरोजगारीनं कळस गाठला असल्याचे अजित पवार म्हणाले. विविध विभागाच्या ठिकाणी मंत्री जात आहेत आणि लेटर देत आहेत असं राज्यात कधीच घडलं नव्हतं असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं तरुणांच्या मनात रोष आहे. कारण त्यांना मिळणारे रोजगार बाहेर गेले आहेत. तरुणांच्या नाराजीचा फटका बसू नय म्हणून काहीतरी दिखावा करण्याचा सरकारचा केविलपणा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यातून प्रकल्प बाहेर गेल्याची सल नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळेच ते रोजगार मेळावे घेत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

हे सरकार जनतेची पूर्णपणे फसवणूक करत आहेत. सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा सुरू आहे,” अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली.

जोपर्यंत १४५ चा आकडा शिंदे सरकारकडे आहे, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार कोसळेल, असा दावा अजित पवार यांनी यावेळी केला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *