अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी

Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

Counting of votes tomorrow for the by-election in Andheri East Assembly Constituency

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या (६ नोव्हेंबरला) होणार आहे.Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

बृहन्मुंबई महापालिकेच्या गुंदवली शाळेमध्ये टपाली मतपत्रिकांच्या गणनेनं सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर अर्ध्या तासानं इव्हीएमची मतमोजणी सुरु होईल. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी तसंच कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

मतमोजणीला २० सूक्ष्मस्तरीय निरीक्षकही हजेरी लावतील. निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारांचे अधिकृत आणि नोंदणी झालेले प्रतिनिधीसुद्धा मतमोजणी प्रक्रियेला उपस्थित असतात.

प्रत्येक फेरीच्या शेवटी मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकातून तसंच मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या ‘एलसीडी स्क्रीन’ वर दाखविण्यात येईल, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *