अन्न व औषध प्रशासनामार्फत २९ कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त

Food-And-Drug-Administration

Food and Drug Administration seizes adulterated food worth Rs. 29 crores

अन्न व औषध प्रशासनामार्फत २९ कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त

मुंबईत तुर्भे इथं टीटीसी औद्योगिक क्षेत्रात छापा टाकून, परदेशातून आयात केलेला 29 कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्न पदार्थ साठा जप्त

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांचा दर्जा खात्रीशीर रहावा, तसंच ग्राहकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावे, यासाठी विशेष तपासणी मोहिम राबवली जात आहे.Food and Drug Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News.

या तपासणी मोहिमेंतर्गत नवी मुंबईत तुर्भे इथं टीटीसी औद्योगिक क्षेत्रात छापा टाकून, परदेशातून आयात केलेला 29 कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्न पदार्थ साठा जप्त केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली आहे.

नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याकरिता अन्न आणि औषध प्रशासनामार्फत अन्न आस्थापनांच्या तपासण्या आणि अन्न नमुने तपासणीचं काम सध्या सुरू आहे.

अन्न आस्थापना, शीतगृह आणि गोदामांमध्ये अचानक भेट देऊन प्रशासनानं धाड टाकली. यामध्ये मे. सावला फूड्स ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रायवेट लिमिटेड डी-39, व सावला फूड्स अॅड कोल्ड स्टोरेज प्रायवेट लिमिटेड डी-514, टीटीसी इंडस्ट्रीअल एरिया, MIDC तुर्भे, या पेढ्यांमधून अन्न पदार्थाचे एकूण ३५ नमुने विश्लेषणासाठी घेऊन त्यांचा उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे.

या दरम्यान 29 कोटी रूपयांची आयात केलेले अन्न पदार्थ जप्त केले आहेत.

साठवणूक केलेल्या काही अन्न पदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्यानं आणि कायद्यातल्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचं आढळून आल्यानं, तसंच अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाल्यानं ही मोहीम राबवली जात असल्याचं पत्रकात नमूद केलं आहे. तपासणी अहवालामध्ये आढळून आलेल्या त्रुटींबाबत ठाण्याच्या अन्न विभागाच्या सहायक आयुक्तांना तपासणी अहवाल पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी पाठवला जाणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *