DigiLocker facility can now be used for health documents as well
डीजिलॉकर सुविधा आता आरोग्यविषयक कागदपत्रांसाठीही वापरता येणार
सरकारने सुरु केलेली डीजिलॉकर सुविधा आता आरोग्यविषयक कागदपत्रांसाठीही वापरता येणार
आरोग्य नोंदी गरजेनुसार पाहता येण्यासाठी ‘हेल्थ लॉकर’ म्हणून वापरता येणार
नवी दिल्ली : डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कागदपत्रांची देवाणघेवाण करणारे अधिकृत व्यासपीठ आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) सह त्याचे दुस-या टप्प्यावर एकत्रीकरण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
डिजीलॉकरचे सुरक्षित क्लाउड-आधारित स्टोअरेज प्लॅटफॉर्म आता लसीकरण रेकॉर्ड, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, लॅबचाचण्यांचे अहवाल, रूग्णालयातून घरी पाठवताना दिलेल्या वैद्यकीय अहवालाचा सारांश इत्यादी आरोग्य नोंदी संग्रहित करण्यासाठी आणि ही माहिती पुन्हा गरजेनुसार पाहता येण्यासाठी ‘हेल्थ लॉकर’ म्हणून वापरता येणार आहे.
महत्त्वाच्या दस्तऐवजांसाठी सरकारने सुरु केलेली डीजिलॉकर सुविधा आता आरोग्यविषयक कागदपत्रांसाठीही वापरता येणार आहे. यात लसीकरणाच्या नोंदी, प्रयोगशाळांमधल्या चाचण्यांचे अहवाल, रुग्णालयातून सुटी देतानाच्या नोंदी इत्यादी मजकूर या डिजिलॉकरमधे साठवून ठेवता येतील.
यापूर्वी आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आरोग्यविषयक डिजिटल खाती सुरु करण्यत आली असून सुमारे १३ कोटी खातेदारांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com