केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद

A one hundred and eight feet tall bronze statue of Nada Prabhu Kempengowda erected at Kempegowda Airport was also unveiled. केम्पेगौडा विमानतळावर उभारण्यात आलेल्या नादप्रभू केम्पेनगौडा यांच्या एकशे आठ फुट उंच कास्य पुतळयाचं अनावरणही झालं हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

The prime minister asserted that speed is an aspiration for the central government and the size and population of the country is its strength

केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

बेंगळूरू: केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते बंगळुरु इथं नादप्रभू केम्पेगौडा आंतरराष्ट्रिय टर्मिनलच्या उद्घघाटन प्रसंगी बोलत होते. प्रधानमंत्री गती शक्ती योजना ही पायाभूत सुविधा विकासाला चालना देत आहे, असं ते म्हणाले.A one hundred and eight feet tall bronze statue of Nada Prabhu Kempengowda erected at Kempegowda Airport was also unveiled.
केम्पेगौडा विमानतळावर उभारण्यात आलेल्या नादप्रभू केम्पेनगौडा यांच्या एकशे आठ फुट उंच कास्य पुतळयाचं अनावरणही  झालं
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू येथे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी विमानतळ प्राधिकरणांशी संवाद साधला. यावेळी त्यांना टर्मिनल 2 च्या इमारतीच्या मॉडेलची माहिती देण्यात आली. पंतप्रधानांनी अनुभूती केंद्रातील सुविधांचीही पाहणी केली आणि केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 च्या परिसरामधून पायी चालत पाहणी केली. पंतप्रधानांनी टर्मिनल 2 बद्दलचा लघुपटही पाहिला.

कर्नाटकला पहिली मेड इन इंडिया वंदे भारत आणि काशी दर्शन या दोन रेल्वे गाड्या मिळाल्या असून इथल्या लोकांची अनेक दिवसांची असलेली दुसऱ्या टर्मिनलची मागणीही आमच्या सरकारनं पूर्ण केली.

पंतप्रधानांनी ट्विट केले;
बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 2 क्षमतेत भर घालेल आणि सुविधांमध्ये आणखी वाढ करेल .आपल्या शहरी केंद्रांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.टर्मिनल सुंदर आणि प्रवासी स्नेही आहे ! त्याचे उद्घाटन करून आनंद झाला.”

क्रांतिवीर सांगोल्ली रायण्णा (केएसआर) रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 7 वर रेल्वेगाडी जिथून सुटते त्या भागात पंतप्रधानांचे आगमन झाले आणि त्यांनी चेन्नई-म्हैसुर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. देशातील ही पाचवी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी आहे आणि दक्षिण भारतातील अशाप्रकारची ही पहिलीच रेल्वेगाडी आहे. ही गाडी चेन्नईचे औद्योगिक केंद्र, बंगळुरूचे तंत्रज्ञान आणि स्टार्टअप केंद्र आणि प्रसिद्ध पर्यटन शहर म्हैसूर यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवेल.

यानंतर पंतप्रधानांनी फलाट क्रमांक 8 वरील रेल्वेगाडी जिथून सुटते त्या भागात जाऊन भारत गौरव काशी यात्रा रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. भारत गौरव योजनेअंतर्गत ही रेल्वेगाडी सुरु करणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. या अंतर्गत कर्नाटकातील यात्रेकरूंना काशीला पाठवण्यासाठी कर्नाटक सरकार आणि रेल्वे मंत्रालय एकत्रितरित्या काम करत आहेत.काशी, अयोध्या आणि प्रयागराजला जाण्यासाठी यात्रेकरूंना सुखकर मुक्काम आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी पंतप्रधानांसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद जोशी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर असून आज सकाळी बेंगळूरू मध्ये विधान सौध इथं ते संत कवी कनक दास आणि महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण केली.

केम्पेगौडा विमानतळावर उभारण्यात आलेल्या नादप्रभू केम्पेनगौडा यांच्या एकशे आठ फुट उंच कास्य पुतळयाचं अनावरणही त्यांच्या हस्ते झालं. यानंतर प्रधानमंत्री तमिळनाडूतील दिंडीगूल इथं गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील.

उद्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि कोनशिला समारंभ पार पडेल. तेलंगणातील रामगुंडम इथल्या आर एफ सी एल च्या कारखान्याला ते भेट देणार असून, इथं देखील त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि कोनशिला समारंभ होणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *