प्राचीन वैद्यक पद्धतीला संशोधन आणि विकासामध्ये भरीव कार्याची अपेक्षा

Ayush-Mantralaya Govt of India

Expect substantial work in research and development with an emphasis on establishing ancient medical practices through scientific evidence

प्राचीन वैद्यक पद्धतीला वैज्ञानिक पुराव्याद्वारे प्रस्थापित करण्यावर भर देऊन संशोधन आणि विकासामध्ये भरीव कार्याची अपेक्षा

नागपुर : आयुर्वेद या प्राचीन वैद्यक पद्धतीला वैज्ञानिक पुराव्याद्वारे २१ व्या शतकात प्रस्थापित करण्यावर आपला भर असला पाहिजे यासाठी संशोधन आणि विकास यामध्ये भरीव कार्य होणं आवश्यक आहे. अशी अपेक्षा आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नागपूरात व्यक्त केली. Ayush-Mantralaya Govt of India

या क्षेत्रात जे विद्यार्थी, संशोधक, निर्माते, वैद्य सर्वांनी एकत्रितपणे भविष्‍यात असा कार्यक्रम आखावा ज्‍यामुळे विश्‍वात नेतृत्‍व करू शकू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने तीन दिवसीय ‘आयुर्वेद पर्व’ आणि आंतरराष्‍ट्रीय परिषदेचं आयोजन पूर्व नागपुरात करण्यात आले होते.

परिषदेचे उद्घाटन राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्‍या हस्‍ते झालं. कार्यक्रमाला, गोव्‍याचे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा यांची उपस्‍थ‍िती होती. ‘हर दिन, हर घर आयुर्वेद’ या मोहिमेच्या माध्यमातून जनसंवाद, जनभागीदारीद्वारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ राहील असा प्रयत्न मंत्रालयाचा असल्याचं सोनोवाल यांनी सांगितल.

आयुर्वेदाला जागतिक अधिष्ठान मिळण्यासाठी आयुर्वेदाची प्रॅक्टिस ही शुद्ध स्वरूपात होणे गरजेचे आहे.

आयुर्वेदाला पुढील २५ वर्षात वैश्विक अधिष्ठान प्राप्त करण्याचा संकल्प करावा असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी केलं. उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक अणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्‍या हस्‍ते या तीन दिवसीय परिषदेचा समारोप होईल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *