भारत जगभरातील गुंतवणूकदारांसाठी प्राधान्य गुंतवणूक केंद्र

Prime Minister Narendra Modi

The Prime Minister asserted that India is rapidly developing as a preferred investment center for investors from around the world

भारत जगभरातील गुंतवणूकदारांसाठी प्राधान्य गुंतवणूक केंद्र म्हणून वेगानं विकसित होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विशाखापट्टणम : भारत जगभरातील गुंतवणूकदारांसाठी प्राधान्य गुंतवणूक केंद्र म्हणून वेगानं विकसित होत असल्याचं मोदी म्हणाले. जगभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट असताना भारत अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी करत आहे. आज पासून सुरु झालेल्या आर्थिक कॉरिडॉरमुळे आंध्रप्रदेश मधील व्यवसाय आणि उद्योग वाढीला चालना मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

Prime Minister Narendra Modi
File Photo

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्रप्रदेश आणि तेलंगणच्या दौर्‍यावर असून आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज झाली. विशाखापट्टनमनी भारताला संपूर्ण जगाशी जोडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.

शिक्षणापासून ते उद्योग, तंत्रज्ञान ते औषधापर्यंत, आंध्र प्रदेशने प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले, आझादी का अमृत काल सोबत भारत प्रगतीच्या मार्गावर पुढे जात आहे आणि आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीचे मूळ सर्वसमावेशक विकासामध्ये आहे.

विशाखापट्टनम मध्ये आज सुरू झालेल्या कनेक्टिविटी, तेल आणि वायु क्षेत्रातील योजनांमुळे आंध्र प्रदेशच्या विकास वेगानं व्हायला मदत होईल. शिक्षणापासून उद्योग तंत्रज्ञानापासून आरोग्य सुविधा पर्यंत आंध्र प्रदेशनी प्रत्येक क्षेत्रात आपलं स्थान मिळवलं आहे अस ही ते म्हणाले.

तेलंगणमधल्या रामगुंडम इथल्या प्रकल्पांना पंतप्रधान आज दुपारनंतर भेट देतील तसंच तिथल्या विविध विकास प्रकल्पांच्या कामाची पायाभरणी करतील.

ब्लू इकॉनॉमीशी संबंधित असीम शक्यता साकार करण्यासाठी देश मोठ्या प्रमाणावर कसे प्रयत्न करत आहे हे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील नवकल्पनांच्या माध्यमातून शेवटच्या टप्प्यापर्यंतही देश आपल्या संधींमध्ये सुधारणा करत असल्याने, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत वेगाने वाटचाल करेल.

श्री. मोदी म्हणाले, ड्रोन ते गेमिंग, स्पेस ते स्टार्टअप, प्रत्येक क्षेत्राला आता पुढे जाण्याची संधी मिळत आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *