जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Jitendra Awhad

A case of molestation has been registered against Jitendra Awhad at Mumbra Police Station

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय

आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार नोंदणाऱ्या महिलेविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ गुन्हा दाखल.

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात काल रात्री उशिरा मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक उड्डाण पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्यावेळी आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार भाजपाच्या एका पदाधिकारी महिलेनं केली आहे.

Jitendra Awhad
File Photo

गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा परिसरात निदर्शनं केली. काही कार्यकर्त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर आज सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

मुंब्र्यातील रिक्षावाल्यांनी रिक्षा बंद केल्या आहेत. मुंब्रा बायपास मार्गावर राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन केल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. या मार्गावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध नोंदवला आहे.

या तक्रारीवरुन आव्हाड यांच्या विरोधात कलम ३५४ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निषेध म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आव्हाड यांच्या विरोधातील एफआयआरची कॉपी हाती आली असून त्यात झालेल्या प्रकाराची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.

मात्र गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे स्पर्श होणं हा विनयभंग आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येतोय. भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने सादर केलेला व्हिडिओच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येतोय. यात जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय केलंय? असा सवालही विचारण्यात येतोय. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाडदेखील आक्रमक झाल्या आहेत.

रिदा रशिद या भाजपाच्या पदाधिकारी असून त्यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. नेमकी घटना काय घडली, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा का दाखल केला याबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार नोंदणाऱ्या महिलेविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ गुन्हा दाखल.

रिदा रशिद यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप शिवा जगताप या तरुणाने केला असून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘२६ ऑक्टोबरला मित्रांसह मुंब्रा इथे मुंब्रेश्वर मंदीर इथे तलावाची पहाणी करण्यासाठी गेला असतांना मला रिदा रशिद यांनी जातीविचाक शिवीगाळ करत धक्काबुक्की करत हाकलून लावले. दिनांक १३ नोव्हेंबरला नवीन पुलाच्या कार्यक्रमासाठी गेलो असतांना तिथेही सर्वांसमोर मानसिक खच्चीकरण होईल असे अनुसूचित जातीव जमातीच्या बाबतीत अपशब्द काढले’ असं गुन्हा दाखल करतांना तक्रारीत जगताप यांने म्हटलं आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *