ईशान्येकडील राज्यांमधल्या दहशतवादाला चाप

Ministry of Home Affairs गृह मंत्रालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Northeast India witnesses 80% decline in insurgency-related incidents since 2014, says Union Home Ministry

ईशान्येकडील राज्यांमधल्या दहशतवादाला चाप

ईशान्येकडील राज्यांमधल्या दहशतवादाला चाप बसल्याचे गृहमंत्रालयानं सादर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट

२०१४ पासून ईशान्य भारतात बंडखोरी-संबंधित घटनांमध्ये ८०% घट:  केंद्रीय गृह मंत्रालय

नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमधल्या दहशतवादाला चाप बसल्याचे गृहमंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून आलं आहे. २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यापासून दहशतवादी कारवायांमध्ये ८० टक्के घट झाल्याचे दिसून आलं.Ministry of Home Affairs गृह मंत्रालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

गेल्या आठ वर्षांच्या काळात विविध गटांतल्या सुमारे ६ हजार दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत नमूद केलं आहे.

२०१९-२०२० या दोन वर्षात दहशतवादाच्या सर्वात कमी घटना घडल्या असून सामान्य नागरिक तसेच संरक्षण दलाचे जवान मृत्यूमुखी पडण्याच्या घटनाही, गेल्या दोन दशकांच्या तुलनेत अत्यल्प असल्याचं निदर्शनास आलं आहे.

गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये दहशतवादी कारवायांच्या एकंदर ८२४ घटना घडल्या होत्या, त्यात सातत्याने घट होत गेली आणि २०२१ मध्ये २०९ तर चालू वर्षात केवळ १५८ घटना घडल्या आहेत.

२०१४ ते २०२२ या काळात ५८७ दहशतवादी ठार झाले तर १० हजार १०७ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. १२८ संरक्षण कर्मचाऱ्यांना या काळात आपले प्राण गमवावे लागले, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.

एमएचएच्या आकडेवारीनुसार या कालावधीत सुरक्षा दलांनी अतिरेक्यांकडून ४,६६२ शस्त्रे जप्त केली आहेत. मोदी सरकारने बंडखोर गटांविरोधात कठोर पावले उचलल्यानंतर ईशान्येकडील सुरक्षा स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

‘द प्राइम मिनिस्टर्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर द ईशान्य’ (PM-DevINE) या नवीन योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये १,५०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक वाटपासह करण्यात आली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *