The Delhi High Court rejected the petition of the Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party challenging the Election Commission’s decision
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली
नवी दिल्ली : शिवसेना हे पक्षाचं नाव, आणि धनुष्य बाण हे पक्षाचं चिन्ह गोठवण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळली.
उद्धव ठाकरे तसंच शिंदे गटातल्या वादानंतर, भारत निवडणूक आयोगानं ८ ऑक्टोबरला एका अंतरीम आदेशाद्वारे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं होतं. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटानं ही याचिका दाखल केली होती.
ठाकरेंच्या गटाने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारीदेखील सुनावणी झाली होती. त्यानंतर आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाची याचिकाच कोर्टाने फेटाळून लावली.
पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवणं किंवा इतर निर्णय घेण्याचा सर्व अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं म्हणत दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे. दिल्ली हायकोर्टाच्या हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर काल जवळपास एक ते दीड सात सुनावणी झाली होती. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची भूमिका सविस्तर ऐकून घेतली होती. त्यानंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
ठाकरे गटाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने त्यांना त्यांची भूमिका लेखी स्वरुपात कोर्टात सादर करण्याची सूचना केली होती. तसेच आपण निवडणूक आयोगाला लवकरात लवकर निर्णय घेण्याची सूचना करु शकतो, असं सांगितलं होतं. त्यानंतर आज कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला आणि ठाकरे गटाची याचिकाच फेटाळली.
त्यावर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. भारत निवडणूक आयोगानं लवकरात लवकर हे प्रकरण निकालात काढावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com