“ विकसित देशासाठी भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी “ बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे “ विशेष ग्राहक मेळावा “

Bank of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Bank of Maharashtra organizes ‘Special Customer Meet” for “Corruption-free India for a Developed Nation”

“ विकसित देशासाठी भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी “ बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे “ विशेष ग्राहक मेळावा “

“ वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न” : बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजयकुमार

पुणे : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने बँकेच्या देशभरातील विभागीय कार्यालये व शाखांमध्ये दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी “ विकसित देशासाठी भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी “ विशेष ग्राहक मेळावा “ आयोजित करण्यात आला होता.Bank of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी बँकेने राष्ट्रव्यापी वित्तीय जागृती अभियान साजरे केले. “ जन भागीदारी “ या बँकेच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या २०७६ शाखा कार्यालये व ४२ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

आपापल्या हद्दीतील स्थानिक पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक , पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त सहायक पोलीस आयुक्त अशा अधिकाऱ्यांना शाखा व विभागीय कार्यालयांमधील या ग्राहक महामेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून बँकेने पोलीस निस्वार्थी, निष्ठापूर्वक व समर्पित वृत्तीने करीत असलेल्या समाजाच्या व देशाच्या सेवेची पावती दिली आहे. त्यांच्या योगदानासाठी बॅंकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

“ वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या सदविवेकबुद्धीतून विकसित देशासाठी आवश्यक अशा भ्रष्टाचारमुक्त देशाची चळवळ सुरु होते आणि दक्षतेची वैशिष्ट्ये अंगी बाणवून आपण सगळे हे साध्य करूया “ असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजयकुमार यांनी केले.

वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहून ग्राहकांनी स्वतःचे कसे संरक्षण करावे या बाबत पोलीस कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शाखेत व बाहेर करावयाचे सुरक्षा उपाय व इंटरनेट वर विविध व्यवहार करताना तसेच भ्रष्टाचार विरोधात जागरूकता बाळगण्याबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले.

सदर “ विशेष ग्राहक मेळाव्यात “ उच्च नेटवर्थ असलेल्या ग्राहक, रिटेल ग्राहक, मध्यम लघु व सूक्ष्म उदद्योगकर्मी, ज्येष्ठ नागरिक / निवृत्तीवेतन धारक, शेतकरी, तसेच बँकेकडून कर्ज घेतलेल्या व तत्परतेने परतफेड करणाऱ्या दुर्बल घटकातील कर्जदार, स्वयंसहाय्य बचत गटातील सभासद, रस्त्यावरील फेरीवाले, मुद्रा कर्जदार ग्राहक अशा जीवनाच्या विविध क्षेत्रातील ग्राहक उपस्थित होते.

विकसित देशासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत या मध्यवर्ती संकल्पनेवर “ संवाद सरिता “ या इ मासिकाची विशेष आवृत्तीचे विमोचन करण्यात आले. तसेच विविध ग्राहकसेवांच्या बाबत ग्राहकांच्या समोर पॉवर पॉइंट सादरीकरण करण्यात आले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *