India’s first T20 match of the three-match series against New Zealand tomorrow
भारताचा न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील उद्या पहिला टी-20 सामना
वेलिंग्टन : भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडबरोबरच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी 20 सामना उद्या वेलिंग्टन इथल्या स्काय स्टेडियमवर खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी१२ वाजता सुरू होईल. २० नोव्हेंबर रोजी बे ओव्हल, माउंट मौनगानुई इथं दुसरा टी- 20 आणि २२ नोव्हेंबर रोजी मॅक्लीन पार्क, नेपियर इथं तिसरा टी- २० सामना खेळला जाईल.
टी- २० मालिकेनंतर एकदिवसीय मालिका होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना २५ नोव्हेंबरला ऑकलंडच्या ईडन पार्कवर होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना २७ नोव्हेंबरला सेडन पार्क, हॅमिल्टन इथं तर तिसरा एकदिवसीय सामना ३० नोव्हेंबरला हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च इथं खेळला जाईल.
रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह सारखे काही प्रमुख खेळाडू या दौऱ्याला अनुपस्थित असतील.
कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत शिखर धवन एकदिवसीय संघाचं नेतृत्व करेल, तर हार्दिक पांड्या टी-20 संघाचा कर्णधार असेल. न्यूझीलंडसाठी, त्यांचा सर्व स्वरूपाचा कर्णधार केन विल्यमसन एकदिवसीय आणि टी-२० संघाचं नेतृत्व करेल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com