बँक ऑफ महाराष्ट्रच्या फसवणूक प्रकरणी १० आरोपींना १ ते ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

Bank of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

10 accused sentenced to 1 to 7 years in jail for defrauding Bank of Maharashtra of Rs 4 crore 57 lakh

बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन ४ कोटी ५७ लाख रुपये लुबाडल्या प्रकरणी १० आरोपींना १ ते ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

हैदराबाद : बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन चार कोटी सत्तावन्न लाख रुपये लुबाडल्याच्या आरोपाखाली हैदराबादच्या विशेष सीबीआय न्यायालयानं १० आरोपींना दोषी ठरवलं असून त्यांना विविध रकमांचे दंड आणि १ ते ७ वर्षापर्यंत कालावधीचा तुरुंगवास ठोठावला आहे. दोषींमधे २ बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याखेरीज ६ खासगी कंपन्यांनाही दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना पन्नास हजार ते एक लाख रुपये दंड ठोठावला आहे.Bank of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

बँक ऑफ महाराष्ट्र, सिकंदराबाद शाखेचे तत्कालीन अधिकारी सरथ बाबू जेली आणि सुहास कल्याण रामदासी यांना न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आणि प्रत्येकी १,१०,००० रुपयांचा दंड ठोठावला, असे सीबीआयने बुधवारी सांगितले.

अन्य तीन आरोपी डोनिकेना श्रीधर, डोनिकेना पूर्णा श्री, मरेल्ला श्रीनिवास रेड्डी यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या दंडासह सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

इतर पाच आरोपी मरेल्ला लक्ष्मा रेड्डी, वेम्पती, श्रीनिवास, वेट्टे राजा रेड्डी, वड्डे नरसैया आणि बथुला सत्य सूरज रेड्डी यांना वेगवेगळ्या दंडाच्या रकमेसह वेगवेगळ्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

बँकेत काम करत असताना सरथ बाबू जेली आणि इतरांनी २०१२ आणि २०१३ या कालावधीत ५ कोटी रुपयांची खेळते भांडवल मर्यादा मंजूर करून खासगी कंपन्यांसोबत कट रचला आणि त्यानंतर निधी वळवला, अशा तक्रारीवरून सीबीआयने २०१३ मध्ये गुन्हा दाखल केला होता.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या सिकंदराबाद शाखेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन तो निधी इतरत्र वळवून बँकेला ४ कोटी ५७ लाख रुपयांना फसवल्याचा आरोप या १० जणांविरोधात होता. २०१३ मधे या गुन्ह्याची नोंद झाली होती. तर २०१४ मधे आरोपपत्र दाखल झालं होतं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *