यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

Sadhana Vidyalaya Hadapsar साधना विद्यालय हडपसर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Yashwantrao Chavan Architect of Modern Maharashtra

यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

-प्राचार्य दत्तात्रय जाधव

साधना विद्यालयात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिननिमित्त कार्यक्रम

हडपसर : “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला” असे यथार्थ ज्यांचे वर्णन केले जाते ते द्विभाषिक व स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमोल योगदान दिले. महाराष्ट्रात पंचायतीराज व्यवस्था,सांस्कृतिक,आर्थिक, औद्योगिक,साहित्य,शिक्षण व कृषी क्षेत्रासाठी यशवंतराव चव्हाण यांनी कार्य केले.त्यांच्या व्यापक दृष्टिकोनामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला.साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव , साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.

भारताचे माजी उपपंतप्रधान व रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजमधील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने रूद्र नवले,व्यंकटेश डाके,या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर शिक्षक मनोगतात प्रतिभा हिले यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या योगदानातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची भूमिका स्पष्ट केली.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, आजीव सभासद लालासाहेब खलाटे,बंकट घुमरे,कुमार बनसोडे सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य ,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता पाषाणकर यानी केले.सूत्रसंचालन रूपाली बागबंदे यांनी केले.तर आभार वंदना अवघडे यांनी मानले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *