प्रा. राम बापट हे सामाजिक शास्त्रांचे ज्ञानकोश’

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

Prof. Ram Bapat is an encyclopedia of social sciences.

प्रा. राम बापट हे सामाजिक शास्त्रांचे ज्ञानकोश’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. राम बापट यांच्या  जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेSavitribai Phule Pune University

पुणे : ‘प्रा. राम बापट (१९३१-२०१२) हे केवळ मार्क्सवादी किंवा डावे नव्हते. त्यांना मुक्तिदायी  परिवर्तनाची आस होती. ‘विचारसरणीचा अंत’ या बहुचर्चित संकल्पनेवर बापट यांचा विश्वास नव्हता. कारण ते विचारसरणीकडे जीवन समजण्याचा आणि बदलण्याचा मार्ग म्हणून पाहात होते. ते अखेरपर्यंत समाजशिक्षकाच्या भूमिकेत वावरले. एका अर्थाने ते सामाजिक शास्त्रांचे ज्ञानकोशच होते’, अशा शब्दांत ज्येष्ठ कार्यकर्ता व लेखक विनय हर्डीकर यांनी प्रा. राम बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. राम बापट यांच्या  जयंतीनिमित्त २२ नोव्हेंबर २०२२ रोजी विनय हर्डीकर व चेन्नईच्या मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज येथील प्रा. अनंत गिरी यांच्या विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरण विनाशाचे आव्हान आणि त्या अनुषंगाने राजकीय तत्त्वचिंतनात फेरबदल करण्याची निकड हा प्रा. बापट यांच्या आस्थेचा आणि लेखनाचा एक महत्त्वाचा विषय होता व त्यावर प्रा. गिरी यांनी व्यासंगपूर्ण मांडणी केली. राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मंगेश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

‘राम बापट यांचा खऱ्या अर्थाने सामाजिक शास्त्रांच्या सर्व विषयांत लीलया वावर राहिला. त्यांचे अष्टपैलू मन नेहमी प्रश्न उपस्थित करायचे आणि त्यांची उत्तरे शोधायचे’, असे विनय हर्डीकर म्हणाले. ‘बापट यांची बुद्धी आणि स्मरणशक्ती अत्यंत तीक्ष्ण होती व त्यांच्याकडे ज्ञानाचा प्रचंड साठा होता.

केवळ विद्यार्थी, मित्रांचेच नव्हे, तर अनेक संस्था, चळवळींमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक होते. त्यांना चर्चेसाठी कोणताही विषय वर्ज्य नसायचा. ते केवळ सिद्धांतातच रमले नाहीत, तर साहित्य, शास्त्रीय संगीत, चित्रपट, चित्रकला अशा क्षेत्रांविषयीही ते तितकेच जाणकार होते’,ह्या शब्दांत हर्डीकर यांनी राम बापट यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा केला.

प्रा. डॉ. मंगेश कुलकर्णी यांनी आभार मानले. या व्याख्यानास विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *