छायाचित्र-पत्रकार एका दिवसात अनेकविध विश्वे अनुभवत असतो

'Frame' is a film on the life of a photo-journalist ‘फ्रेम’ हा छाया-पत्रकाराच्या आयुष्यावरील सिनेमा आहे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

A photojournalist experiences multiple worlds in a single day

छायाचित्र-पत्रकार एका दिवसात अनेकविध विश्वे अनुभवत असतो

आजच्या खळबळजनक वृत्तांच्या भाऊगर्दीत कुठलीही बातमी ‘खास एकमेव’ बातमी राहत नाही : विक्रम पटवर्धन

‘फ्रेम’ हा छाया-पत्रकाराच्या आयुष्यावरील सिनेमा

गोवा/मुंबई : “आज पत्रकारीतेत, सनसनाटी, खळबळजनक ब्रेकिंग न्यूजचे युग आले आहे, अशा काळात कोणतीही बातमी ‘विशेष, खास किंवा एकमेव’ बातमी राहत नाही.” असं मत, ‘फ्रेम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, विक्रम पटवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. तसेच, जेव्हापासून फोटो निर्मितीमध्ये, नवं तंत्रज्ञान आलं आहे, तेव्हापासून छाया-पत्रकारितेच्या व्यवसायात आमूलाग्र परिवर्तन झाले आहे, असंही ते पुढे म्हणाले.'Frame' is a film on the life of a  photo-journalist
‘फ्रेम’ हा छाया-पत्रकाराच्या आयुष्यावरील सिनेमा आहे
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

गोव्यात 53 व्या इफ्फीदरम्यान पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘टेबल टॉक्स’ या संवाद सत्रात त्यांनी आज माध्यम प्रतिनिधी आणि इतरांशी संवाद साधला.

विक्रम पटवर्धन म्हणाले की, की ‘फ्रेम’ हा अशा छाया-पत्रकाराच्या आयुष्यावरील सिनेमा आहे, ज्याचा असा विश्वास असतो, की ‘छाया-पत्रकाराचा धर्म असतो कोणत्याही घटनेचे,ती जशी घडली, तसेच वार्तांकन करणे. ती घटना दाखवतांना त्यात काहीही मोडतोड न करता,जे आहे ते लोकांसमोर आणणे महत्वाचे.

यावेळी छायाचित्र-पत्रकाराच्या आयुष्याविषयी बोलतांना विक्रम पटवर्धन म्हणाले, की छाया-पत्रकार एकाच दिवसात अनेकविध विश्वे अनुभवत असतो.” आपल्या स्वतःच्या अनुभवांच्या आधारावर त्यांना छायाचित्रकाराच्या आयुष्यातील आव्हाने या चित्रपटातून मांडायची होती.

हा चित्रपट, प्रमुख व्यक्तिरेखा असलेले, छाया-पत्रकार, चंदू पानसरे हा मध्यमवयीन पत्रकार आहे, आणि ‘ आपल्या व्यवसायाप्रमाणेच, आपले आयुष्य देखील एक कला आहे,’ असे त्याचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. मात्र, एक व्यक्ती म्हणून, जेव्हा त्याच्यासमोर त्याचे व्यावसायिक मूल्ये आणि समाजाप्रतीची कर्तव्ये यांच्यातला संघर्ष उभा राहतो. नव्यानेच नियुक्त झालेल्या युवा छाया चित्रकार, सिद्धार्थ देशमुख यांच्या सीपी मनात आदर आहे, मात्र या प्रवासात मूल्यांच्या बाबतीत, सीपी आणि त्यांचा शिष्य यांच्यात, मतभेद निर्माण होतात.

चित्रपटाविषयी माहिती

दिग्दर्शक : विक्रम पटवर्धन

निर्माते: झी स्टुडिओ

पटकथा: विक्रम पटवर्धन

छायाचित्रण: मिलिंद जोग

संकलक: कुटुंब इनामदार

कलाकार: नागराज मंजुळे, अमेय वाघ, मुग्धा गोडसे, अक्षय गुरव

2021 | Marathi | Colour | 118 mins.

कथासार:

“आपल्या व्यवसायाप्रमाणेच आपले आयुष्य देखील एक कला आहे आणि कोणत्याही कलेचे कोणतेही स्वरूप नसते,” चंदू पानसरे, पंचेचाळीस वर्षीय फोटो पत्रकार नव्याने रुजू झालेल्या तेवीस वर्षीय ज्युनियर फोटोजर्नालिस्ट, सिद्धार्थ देशमुखला सांगतात. दोघेही पुण्यातील एका वृत्तपत्रात काम करतात. चंदू पानसरेंचा हा सल्ला सिद्धार्थ प्रत्यक्षात जगतो. मात्र, नंतर त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अनिश्चित घटनांची साखळी आणि दक्षिण महाराष्ट्रातील भूकंपामुळे त्यांच्या जीवनाचा मार्ग कसा बदलतो हे या चित्रपटात दाखवले आहे.

दिग्दर्शक: विक्रम पटवर्धन हे पुणे, महाराष्ट्रातील छायाचित्र पत्रकार आहेत आणि आपल्या कारकिर्दीत त्यांनी संस्कृतिक घडामोडीपासून ते गुन्हेगारी, राजकारण आणि क्रीडा अशा विविध विषयांवर छाया पत्रकारिता केली आहे. ‘फ्रेम’ हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *