महात्मा जोतीराव फुले यांच्या 132 व्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक विचारांची ज्योत यात्रा

Mahatma Jyotiba Phule महात्मा ज्योतिबा फुले हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Jyot Yatra on the 132nd Commemoration Day of Mahatma Jotirao Phule

महात्मा जोतीराव फुले यांच्या 132 व्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक विचारांची ज्योत यात्रा

हडपसर मध्ये महात्मा जोतिराव फुले यांना विनम्र अभिवादन

हडपसर : महात्मा फुलेंच्या समता न्याय बंधुत्व या विचारांचा वारसा ज्योत रुपी सतत तेवत राहो यासाठी हडपसर मधील ऐतिहासिक गांधी चौक येथून सत्यशोधक ग्यानोबा ससाणे व सत्यशोधक वकील गेणूजी सातव यांचे नातू विठ्ठल सातव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्योत यात्रेस सुरुवात झाली.Mahatma Jyotiba Phule महात्मा ज्योतिबा फुले हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

हडपसर व महात्मा फुले यांचे हडपसर मधील शैक्षणिक सत्यशोधक विचारांचे कार्य ग्यानोबा ससाणे व गेनूजी ससाणे यांनी चालविले ते तसेच पुढे चालू राहावे त्यासाठी सत्यशोधक विचारांची ज्योत समता भूमीकडे नेण्यात आली.

मगरपट्टा , फातिमा नगर , महात्मा फुले पेठ या ठिकाणी ज्योती चे स्वागत करण्यात आले. सर्व सामाजिक राष्ट्रपुरुष व सामाजिक क्रांतिकारक या सर्वांच्या नावांचा जय घोष करत ज्योत व सर्व फुले प्रेमी समता भूमीकडे ज्योत घेऊन जात होते.

समता भूमीवर समता परिषदेकडून भव्य स्वागत करण्यात आले. सर्वांनी पुष्पहार अर्पण केला . फुले यांनी रचलेले अखंड घेण्यात आले. सर्वांनी फुले वाडा ,समताभूमी विचारांची प्रेरणा घेतली. सर्वांनी फुले वाड्यात असलेल्या त्यांच्या आठवणी व अस्पृश्य यांच्या साठी खुली केलेली विहीर व त्यांच्या अस्ती चे दर्शन घेतले, मोठ्या उत्साहाने सदर कार्यक्रम संपन्न झाला.

सदर संपूर्ण ज्योत यात्रे चे नियोजन महात्मा जोतीराव फुले समिती हडपसर , स्वर्गीय अर्जुन बनकर प्रतिष्ठान यांच्या कडून करण्यात आले होते . प्रमुख नियोजनात मुकेश वाडकर ,गणेश फुलारे, नितीन आरु ,स्वप्नील सातव , शिरीष हिंगणे , महेश ससाणे , पांडुरंग माटे, वृषाली वाडकर, सोनल कोद्रे , मनीषा हिंगणे , संगीता बोराटे , सुनीता भगत ,महेंद्र बनकर ,विठ्ठल सातव सहभाग होता.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *