Good demand for Indian sugar from the international market
भारतीय साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारातून चांगली मागणी
नवी दिल्ली : गेल्या वर्षी भारतातून ११२ लाख टन साखरेची विक्रमी निर्यात झाल्यानंतर चालू साखर हंगामात देखील भारतीय साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारातून चांगली मागणी असल्याचं साखर निर्यातदार व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.
यंदाच्या हंगामात साखरेचं होणारं अतिरिक्त उत्पादन लक्षात घेता साखर निर्यातीसाठी केंद्रानं मुक्त साखर निर्यात धोरणाचा अवलंब करावा अशी मागणी निर्यातदार व्यापारी संघटनेकडून करण्यात आली आहे.
केंद्र सरकारनं मात्र यापूर्वीच प्रत्येक साखर कारखान्याला साखर निर्यातीचा कोटा ठरवून देणारं धोरण जाहीर केलं असून पहिल्या टप्प्यात ६० लाख टन साखर निर्यातीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं आहे.
भारत या वर्षी डिसेंबरपर्यंत साखरेच्या निर्यातीसाठी अनेक करारांवर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे, नियुक्त केलेल्या 60 लाख टन साखरेचे उत्पादन आणि मार्च-अखेर 2023 पर्यंत वितरण पूर्ण केले जाईल. दरम्यान, उद्योगाला आशा आहे की पहिल्या बॅचची निर्यात झाल्यानंतर सरकार २० लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी देईल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com