कायस्थांच्या एकविरा देवी उत्सवामुळे नवी प्रेरणा मिळाली

Ekvira Devi Karla एकविरा देवी कार्ला हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

The Ekvira Devi festival of the Kayasthas got new inspiration

कायस्थांच्या एकविरा देवी उत्सवामुळे नवी प्रेरणा मिळाली

एक दिवस कायस्थांच्या (CKP) समारोहात उद्योगपती अर्जुन देशपांडे यांचे प्रतिपादन

पुणे : कायस्थांच्या (CKP)  श्री एकविरा देवी उत्सवामुळे आपल्याला एक नवी प्रेरणा मिळाली असल्याचे प्रतिपादन सध्या देशभर गाजत असलेले तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांनी केले आहे.Ekvira Devi Karla एकविरा देवी कार्ला हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

सीकेपी संस्थेतर्फे `एक दिवस कायस्थांचा’ एकविरा गडावर हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. काल झालेल्या उत्सवाला प्रथमच अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.

संपूर्ण देशातील सीकेपी समाजातील मंडळी या उत्सवासाठी एकविरा गडावर जमली होती. यंदा प्रथमच ज्ञातीतील गुणवंतांचा शानदार गौरव समारंभही करण्यात आला. उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे, मुंबईचे विख्यात विधीज्ञ अ‍ॅड. अजित ताम्हाणे, उत्सवाचे संयोजक तुषार राजे, रघुवीर देशमुख, राजेश देशपांडे, राममारुती संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी इत्यांदी उपस्थित होते.

`एक दिवस कायस्थांचा’ उत्सवाने आपल्याला नवी प्रेरणा मिळाली आहे. एकविरा देवीच्या कृपेने आपली व्यवसायातील प्रगती होत आहे. आपण दरवर्षी या उत्सवासाठी अगत्याने येणार असून उत्सवाला संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही उद्योगपती अर्जुन देशपांडे यांनी दिली. तसेच आज आपण कायस्थ असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो असेही त्यांनी सांगितले.

एक दिवस कायस्थांचा निमित्ताने संपूर्ण देशातील सीकेपी समाज एकत्र येत आहे, ही एक चांगली सुरुवात असून एकविरा मंदिर परिसरातील ज्ञातीची वास्तू उभारण्याची झालेली घोषणा स्वागतार्ह आहे व त्यासाठी आपण सर्व सहकार्य करण्यास तयार आहोत असे अ‍ॅड. अजित ताम्हाणे यांनी सांगितले.

उत्सवाच्या आदल्या दिवशी एकविरा देवीचा भाऊ बहिरीदेव याला आमंत्रण देण्यात आले. सकाळी सहा पासून उत्सवास प्रारंभ झाला. सकाळी ६ वाजता एकविरा देवीचा महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर अकरा जोडप्यांसह होमहवन करण्यात आले.

एकविरेचा गोंधळ कमालीचा लोकप्रिय ठरला. शिवाय भक्तीसंगीताचाही कार्यव्रâम झाला. ज्ञातीतील अनेक नामवंतांचा गौरव करण्यात आला. डॉ. विजयकुमार डोंगरे (पद्मश्री), निखिल चिटणीस (एअर मार्शल), प्राजक्ता रणदिवे (न्यायमूर्ती), आरती देशपांडे (उद्योजिका), शैलाताई फासे-मथुरे (उद्योजिका व समाजसेविका), दिपक देशपांडे (अतिरिक्त आयुक्त-आयकर), संजयराज गौरीनंदन (गायक संगीतकार), निलेश वैद्य (संचालक अपना बाजार), डॉ. राजेश गुप्ते (वैद्यकिय सेवा), दिलीप गडकरी (साहित्यिक-समाज कार्यकर्ते), हेमभुषण कुळकर्णी (चांद्रसेनिय कायस्थ प्रभु गौरव गाथेचे संकलक), जयदिप कोरडे (तरुण तडफदार समाज कार्यकर्ते) सुबोध देशपांडे (टेबल टेनिस) इत्यांदींचा गौरव करण्यात आला. महाआरतीने उत्सवाची सांगता करण्यात आली.

८६व्या वर्षी नवे हॉटेल सुरु करणारी आई

या गौरव सोहळ्यात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या मोठ्या भगिनी शैलाताई फासे यांनी केलेल्या भाषणात आनंद दिघे यांच्यामुळेच आपण लोणावळ्यात हॉटेल व्यवसाय सुरु करु शकलो असे सांगत आता लोणावळा मुख्य रस्त्यावर मोठे हॉटेल बांधत आहोत. ८६व्या वर्षातही आपली जिद्द कमी झालेली नाही. तसेच धर्मवीर आनंद दिघे चित्रपटाबाबतही त्यांनी नापसंती दर्शविली.

वास्तु उभारण्याचा निर्धार

एक दिवस कायस्थांचा निमित्ताने एकविरा मंदिर परिसरात सीकेपी समाजाची हक्काची वास्तु उभी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे त्याला सर्व उपस्थितांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या वास्तुसाठी विश्वस्त रुपाने व अन्य मार्गाने मदत देणग्या मिळवून देण्याचे अनेकांनी मान्य केले.

या शानदार उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री सीकेपी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, रघुवीर देशमुख, राजेश देशपांडे, पुरुषोत्तम फडणीस, जयदिप कोरडे, राहुल देशपांडे, संजय कर्णिक, चंद्रशेखर राजे, अशोक कुळकर्णी, निलेश गुप्ते, मंदार कुळकर्णी, मिलिंद राजे, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, आदित्य देशमुख, सागरिका कर्णिक, गौरी मथुरे, अंजली प्रधान, विभा कर्णिक इत्यांदींसह अनेकांनी मेहनत घेतली. कार्यव्रâमाचे सूत्रसंचालन प्राची गडकरी यांनी केले. उत्सवासाठी देशाच्या सर्व भागातून ज्ञातीबांधव उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *