शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती करायला वंचित बहुजन आघाडी तयार

Prakash Ambedakr- Uddhav Thakre हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Vanchit Bahujan Aghadi ready to form alliance with Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती करायला वंचित बहुजन आघाडी तयार

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीनं आपला होकार कळवला असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.Prakash Ambedakr- Uddhav Thakre हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

दोन्ही पक्षातल्या युतीसंदर्भात आत्तापर्यंत दोन बैठका झाल्या. या बैठकींमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पक्षाचे राज्य समितीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेचे काही खासदार सहभागी झाले होते.

दोन्ही बैठकांमध्ये युती करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. युती केल्यावर निवडणूका कशा पद्धतीनं लढवायच्या या मुद्यावर ठाकरे यांच्या बाजुनं निर्णय व्हायचा, त्यानंतर पुढच्या टप्प्याची चर्चा होईल असं या निवेदनात म्हटलं आहे.

सध्या शिवसेना महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी शिवसेना हादेखील एक पक्ष आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीतील चौथा पक्ष असेल की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार, याबाबत आम्हाला निश्चितता हवी आहे. त्यानंतरच पुढचे बोलणे सुरू होईल,” असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.

‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एका मंचावर आले होते. प्रकाश आंबेडकर यांना भेटताना वेळ काढावा लागतो. आमचे वैचारिक व्यासपीठ एक आहे. दोन विचारांचे वारसे पुढे घेऊन जात आहोत, असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं. या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती करायला वंचित बहुजन आघाडी तयार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *