साताराकडून पुण्याकडे येणारी वाहतूक नवीन कात्रजबोगद्यातून दरीपूलमार्गे

Traffic coming from Satara to Pune through the new Katraj Tunnel via Daripool

साताराकडून पुण्याकडे येणारी वाहतूक नवीन कात्रजबोगद्यातून दरीपूलमार्गे

पुणे : पुणे कात्रज- शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख District Magistrate and District Collector Dr. Rajesh Deshmukh हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करुन वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

जुना कात्रज घाट रस्त्याच्या कि.मी. २२/०० ते २०/२०० या लांबीत डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताच्या शक्यता लक्षात घेऊन या उपाययोजन करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या रस्त्यावर एकेरी वाहतूक करुन साताराकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

पुणे मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व गृह विभागाचे १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *