पुणे ते सिंगापूर थेट आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावर विमान उड्डाण सुरू

Jyotiraditya-Scindia Minister of Civil Aviation. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Direct international flights from Pune to Singapore have started

पुणे ते सिंगापूर थेट आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावर विमान उड्डाण सुरू

ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी पुणे ते सिंगापूर थेट आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाचे केले उद्‌घाटन

विस्तारा आठवड्यातून चार वेळा या हवाई मार्गावर विमान उड्डाण करणार

नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 1 डिसेंबर 2022 रोजी पुणे ते सिंगापूर थेट आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाचे उद्‌घाटन केले. या हवाई मार्गावर 2 डिसेंबरपासून विमान उड्डाण सुरू होईल.

Jyotiraditya-Scindia Minister of Civil Aviation. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले पुणे शहर नवोन्मेष, शिक्षण आणि विकासाचे केंद्र बनण्यासाठी निरंतर आगेकूच करत असल्याचे सिंधिया आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले. या वाढीला चालना देत, पुण्याचा संपर्क वाढवण्यासाठी सरकारने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी संपर्क वाढवणे, नवीन टर्मिनल विकसित करणे आणि शहराला स्वतंत्र कार्गो टर्मिनल पुरवून पायाभूत सुविधा वाढवणे या सारख्या अनेक उपक्रमांची योजना आखली आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे-सिंगापूर उड्डाणाची सुरुवात ही पुण्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना असल्याचे ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले. पुणे आणि बँकॉक दरम्यान नव्याने सुरू करण्यात आलेल्या हवाई मार्गाचाही त्यांनी उल्लेख केला. हे दोन मार्ग पुण्याला केवळ महत्त्वाच्या जागतिक स्थळांशी जोडणार नाहीत, तर शहराच्या विकासासाठी रोजगार, शिक्षण, व्यापार आणि व्यवसाय या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध करून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टर्मिनलची वाढती वर्दळ लक्षात घेत 475.39 कोटी रुपये खर्च करून नवीन टर्मिनल बांधले जात आहे. त्यामुळे टर्मिनलचे वर्तमान क्षेत्र 22,500 चौरस मीटरवरून वाढून 48,500 चौरस मीटर होईल. पुण्यातून निर्यातीला चालना देण्यासाठी, एक नवीन आंतरराष्ट्रीय एअर कार्गो टर्मिनल देखील बांधले जात आहे जे डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल. पुणे विमानतळावर 120 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेली बहुस्तरीय पार्किंग सुविधा नुकतीच 25 नोव्हेंबर 2022 रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *