Will answer the opposition’s allegations through work Chief Minister Eknath Shinde
विरोधकांच्या आरोपांना कामाद्वारे उत्तर देऊ अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती
नव नियुक्त आयुक्तांचे विशेष कौतुक
ठाणे : ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकाराण्याकरिता लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘माझे ठाणे’ ही भावना मनात ठेवून उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच ठाणे महानगरपालिकेचा विशेष उपक्रम “मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे” या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला.
विरोधकांच्या आरोपांना कामाद्वारे उत्तर देऊ अशा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महापालिकेच्या विविध विकासकामांचं उदघाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे शहरानं आपल्याला मुख्यमंत्री केलं असून ठाण्याचा विकास हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे, असं ते म्हणाले. ठाणे शहरातले रस्ते खड्डेमुक्त व्हावेत आणि सर्व चौकाचं सुशोभीकरण व्हावं यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
नव नियुक्त आयुक्तांचे विशेष कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या कामाबद्दल विशेष कौतुक केले. श्री. शिंदे म्हणाले की आयुक्त बांगर यांचे नवी मुंबईतील काम प्रशंसनीय आहे. ज्याप्रमाणे त्यांनी नवी मुंबई शहराला स्वच्छ आणि सुंदर शहर ही ओळख निर्माण करुन दिली. हीच अपेक्षा ठाण्याबद्दल आहे. बांगर यांच्या कार्यकाळात ठाणे शहराचाही कायापालट होईल आणि एक स्वच्छ व सुंदर ठाणे पहायला मिळेल.
यावेळी श्री बांगर यांनी मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान आणि महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पना व ध्येयानुसार विकास कामे सुरू आहेत. ठाणे सुंदर व स्वच्छ दिसावे, वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी महापालिका काम करत असल्याचे श्री. बांगर यांनी यावेळी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com