The US designates China, Iran, and Russia as countries of concern over Religious Freedom
चीन, इराण आणि रशिया यांना धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गत विशेष चिंतेचे देश म्हणून अमेरिकेनं केलं घोषित
वॉशिंग्टन : अमेरिकेने काल चीन, इराण आणि रशिया यांना विविध क्षेत्रातील त्यांच्या कारवायांवरील गंभीर उल्लंघनांबद्दल धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गत विशेष चिंतेचे देश म्हणून घोषित केलं आहे.
या यादीत उत्तर कोरिया आणि म्यानमारचाही समावेश असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी सांगितलं. पाकिस्तान, क्युबा, इरिट्रिया, निकाराग्वा, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान हे विशेष चिंतेचे देश म्हणून नियुक्त केलेले इतर देश आहेत.
अल्जेरिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, कोमोरोस आणि व्हिएतनाम यांनाही वॉच लिस्टमध्ये ठेवण्यात आले होते.
ब्लिंकन पुढे म्हणाले की, जगभरातील सरकारे आणि गैर-राज्यांना वॉच लिस्ट याद्यांमधून काढून टाकण्यासाठी संबंधित राष्ट्रांशी चर्चा मसलत करुन ठोस पावले उचलण्याची गरज आहे.अमेरिका संबंधित राष्ट्र प्रमुखांना भेटण्याच्या संधीचे स्वागत करेल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com