मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

Inspection of Samriddhi Highway by Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Inspection of Samriddhi Highway by Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

Inspection of Samriddhi Highway by Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavisमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Image by : https://newsonair.gov.in/

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची पाहणी केली. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा ५५ किलोमीटर मार्ग असून या मार्गाचं संपूर्ण काम पूर्ण झालं आहे. विरुळ टोल प्लाझा इथं आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी त्यांचं स्वागत केलं.

त्याआधी नागपूर इथं बातमीदारांशी बोलताना मुख्यंत्र्यांनी सांगितलं, की नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गामुळे नागपूर- मुंबई हे जवळपास १६ ते १८ तासाचं अंतर केवळ सहा ते सात तासात पार करणे शक्य होणार आहे. या महामार्गाचं उद्घाटन येत्या ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

या महामार्गाच्या माध्यमातून १० जिल्हे प्रत्यक्ष, तर १४ जिल्हे अप्रत्यक्षरीत्या जोडले जाणार असून या संपूर्ण भागात कृषी, उद्योग समृद्धी येईल, असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं. समृद्धी महामार्ग हा एकूण ७०१ किमीचा लांबीचा महामार्ग असून नागपूर जिल्ह्यातल्या शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातलं आमने गाव यांना जोडणार आहे.

आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाचशे किलोमीटरच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्यावर प्रवास करुन या महामार्गाची पाहणी करत आहेत. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या 100 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी जाताना फडणवीस यांनी स्वतः सारथ्य केलं.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या कारंजा टोल प्लाझा, शेलूबाजार टोल प्लाझा व मालेगाव टोल प्लाझाची पाहणी केली.

शेलुबाजार ते मालेगाव दरम्यान सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील समृद्धी महामार्गावरील बेस कॅम्प येथे मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि श्री. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आगमन प्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील दोनद (खुर्द) येथून सुरू होणारा समृद्धी महामार्ग मालेगाव तालुक्यातील केनवड येथून पुढे बुलढाणा जिल्ह्यात जातो. ९७ किमीचा हा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातून जातो.

अमरावती जिल्ह्यात महामार्गावर आसेगाव आणि शिवणी या दोन ठिकाणी टोल प्लाझा देण्यात आले आहे.

नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे या तालुक्यातून आणि 46 गावांमधून महामार्ग जात आहे. एकूण लांबी 73 किमी आहे. महामार्गाची रुंदी 120 मीटर असून सदर मार्ग 6 पदरी आहे.

मार्गावर 4 मोठे व 64 लहान अशा 68 पुलांचा समावेश आहे. एक रेल्वे उड्डाणपूल आहे. महामार्गावरील वाहतुक विना अडथळा होण्यासाठी 31 व्हेईकल अंडरपास आहेत. लाईट व्हेईकल अंडरपास 9 आहेत. प्राण्यांना संचारासाठी कॅटल अंडरपास 34 आहेत. व्हेईकल ओव्हरपास एक आहे. महामार्गासाठी जिल्ह्यात 1 हजार 73 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यात महामार्गासाठी 2 हजार 850 कोटी खर्च झाला आहे.

दौऱ्याच्या अनुषंगाने धामणगावनजिकच्या टप्प्यावर जिल्हा प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार प्रताप अडसड, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपजिल्हाधिकारी राम लंके, तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी, वैशाख वाहुरवाघ यांच्यासह पोलीस अधिकारी, समृद्धी महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *