PM Modi expresses gratitude to global leaders for support towards India’s G-20 presidency
भारताच्या G-२० अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी मानले जागतिक नेत्यांचे आभार
नवी दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या G-२० अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याबद्दल जागतिक नेत्यांचं आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. भारताच्या G-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बिडेन यांचं मोलाचं समर्थन बळ देणारं ठरेल अशी आशा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आणि त्यांचे आभार मानले.
जागतिक विकासाच्या आणि पुढच्या पिढ्यांचा विचार करता पृथ्वी ग्रहासंदर्भातल्या अनेक समस्यांवर एकत्र काम करण्याचं महत्त्व मोदींनी अधोरेखित केलं.
भारताच्या G-२० अध्यक्षपदासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचेही प्रधानमंत्र्यांनी आभार मानले आणि अध्यक्षपदाच्या काळात मॅक्रॉन यांच्याशी सल्लामसलत करायला आपण उत्सुक असल्याचं सांगितलं.
जपानचे प्रधानमंत्री, फुमियो किशिदा यांच्या ट्विटला उत्तर देताना प्रधानमंत्री म्हणाले की, किशिदा यांनी एकतेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे जपानने जागतिक कल्याणासाठी खूप योगदान दिलं आहे. विविध आघाड्यांवर जपानच्या यशातून जग शिकत राहील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्या अभिनंदन संदेशाला दिलेल्या उत्तरात मोदी म्हणाले की, त्यांच्या सक्रिय सहभागासाठी ते उत्सुक आहेत.
भारताच्या G-२० अध्यक्षपदासाठी स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांनी व्यक्त केलेल्या शुभेच्छांबद्दल, प्रधानमंत्री मोदींनी त्यांच्या गौरवशील शब्दांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com