One hundred and fifty memorandum of understanding of the university in three years
विद्यापीठाचे तीन वर्षात दीडशे सामंजस्य करार
रोजगारभिमुख शिक्षण, उद्योगांशी समन्वय, संशोधन आणि संशोधनातून तंत्रज्ञान विकास यासाठी सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नामांकित संस्थांशी करार: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शैक्षणिक घोडदौड
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घौडदौड कायम आहे. मागील तीन वर्षात विद्यापीठाने १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नामांकित संस्थांसोबात सामंजस्य करार केले आहे. याचा लेखाजोखा नुकत्याच झालेल्या कुलगुरूंच्या संयुक्त बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी मांडला.
नवीन शैक्षणिक धोरणात अकॅडमीक क्रेडिट बँक, द्विलक्षी अभ्यासक्रम, क्रेडिट बेस चॉईस सिस्टीम, संशोधन आदींबाबत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. रोजगारभिमुख शिक्षण, उद्योगांशी समन्वय, संशोधन आणि संशोधनातून तंत्रज्ञान विकास यासाठी हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांशी विद्यापीठाने करार केले आहेत.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कराराच्या माध्यमातून शैक्षणिक देवाण घेवाण, संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान आदी गोष्टी मोठ्या प्रमाणावर साध्य करणे शक्य झाले आहे. अकॅडमीक क्रेडिट बँक, बहुसंस्था धोरण, उद्योग क्षेत्राशी संबंध, संशोधन याचा फायदा विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांना होणार आहे.
डॉ.कारभारी काळे, कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
आंतरराष्ट्रीय करारामध्ये विद्यापीठाने हार्वर्ड बिझनेस स्कूल, मेलबर्न युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ केलिफॉर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे सिटी कॉलेज, जपान, ऑस्ट्रिया, पॅरिस, फ्रान्स, पॅरिस, ग्रीस, जर्मनी, नॉर्वे, लंडन, यूएसए, पोलंड आदी देशात असणाऱ्या विद्यापीठ आणि तेथील नामांकित शैक्षणिक संस्थांशी करार केले आहेत.
तर राष्ट्रीय पातळीवर देखील इस्रो, मारुती सुझुकी, चार्टर्ड अकाऊंटट इन्स्टिट्यूट, आयबीएम इनोवेशन सेंटर, आयुष इन्स्टिट्युशन, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी, सिरम इन्स्टिट्यूट, एएफएमसी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेट्रोनिक टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नचारोपथी, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय आदी महत्त्वाच्या संस्थांसोबत करार झाले आहेत.
तर स्थानिक पातळीवर देखील राजा दिनकर केळकर संग्रहालय, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, संचेती हेल्थकेअर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, ड्रोन आचार्य एरियल इनोवेशन आदींसह अनेक संस्थांचा समावेश आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com