Nagpur’s flyover has a place in the Guinness Book of World Records
नागपूरच्या उड्डाणपूलाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान
श्री नितीन गडकरी यांनी टीम एनएचएआय आणि महा मेट्रोचे केले अभिनंदन
नवी दिल्ली : नागपूरमध्ये सिंगल कॉलमच्या आधारावर महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट (3.14 किमी) बांधून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका ट्विट मालिकेच्या माध्यमातून ,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) आणि महा मेट्रो टीमचे अभिनंदन केले आहे.
या प्रकल्पाने एशिया बुक आणि इंडिया बुकमध्ये यापूर्वीच विक्रम नोंदवला आहे. आता हा प्रतिष्ठित सन्मान मिळणे हा आमच्यासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे, असे गडकरी म्हणाले. हे घडवून आणण्यासाठी चोवीस तास प्रयत्न करणारे अतुलनीय अभियंते, अधिकारी आणि कामगारांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना सलाम करतो , असे मंत्री म्हणाले.
अशाप्रकारचा विकास म्हणजे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com