The World Bank estimates the growth rate of India’s economy at 6.9 percent
भारताच्या अर्थ व्यवस्थेच्या वाढीचा दर ६ पूर्णांक ९ शतांश टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थ व्यवस्थेच्या वाढीचा दर ६ पूर्णांक ९ शतांश टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेनं आज व्यक्त केला. हा दर साडेसहा टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेनं ऑक्टोबरमध्ये व्यक्त केला होता. त्यात आता सुधारणा केली आहे.
भारताची अर्थव्यवस्था बिघडत चाललेल्या बाह्य वातावरणात लक्षणीयरीत्या लवचिक राहिली आहे आणि इतर उदयोन्मुख बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत मजबूत आर्थिक मूलभूत तत्त्वांनी ती चांगल्या स्थितीत ठेवली आहे,” असे जागतिक बँकेचे भारतातील देश संचालक ऑगस्टे कौमे यांनी एजन्सीच्या ताज्या इंडिया डेव्हलपमेंट अपडेटमध्ये म्हटले आहे.
“नीती सुधारणा आणि विवेकपूर्ण नियामक उपायांनी देखील अर्थव्यवस्थेत लवचिकता विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे,” असे त्यात म्हटले आहे.
आव्हानात्मक परिस्थितीतही भारतानं लवचिकता दाखवली होती. देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारत चांगली वाढ नोंदवेल अशी अपेक्षा आहे, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com