New Municipality of Fursungi and Uruli Deva in Pune District
पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची नवी नगरपालिका
नवीन नगरपालिका नागरी विकासामध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल
मुंबई : पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर आणि मुलभूत सोयी सुविधांबाबत काल मुंबईत एक बैठक झाली.
पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मुलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या निर्णयासाठी उपस्थित फुरसुंगी आणि ऊरळी देवाची येथील नागरिकांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले. तसेच पुणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या कचरा व्यवस्थापन तसेच अन्य नागरी प्रकल्पांमध्येही सहकार्य दिले जाईल असे सांगितले.
‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 यावर्षी फुरसूंगी आणि उरूळी देवाची यासह 11 गावं समाविष्ट करण्यात आली होती. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख लोकसंख्या आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com