Opportunity to hear ‘La Carisalve’ musical band at university
विद्यापीठात ‘ला कॅरिसाल्व्हे’ म्युझिकल बॅन्डला ऐकण्याची संधी
ललित कला केंद्र आणि आयसीसीआर च्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : कॅरेबियन राष्ट्र डॉमिनिकन रिपब्लिकच्या ‘ला कॅरिसाल्व्हे’ या प्रसिद्ध म्युझिकल बॅन्डला ऐकण्याची संधी दि. ९ डिसेंबर २०२२ पुणेकर रसिकांना मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील संत ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.
भारत आणि इतर देशांमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी, सांस्कृतिक देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने १९५० साली तत्कालीन शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची स्थापना केली.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन झालेल्या या परिषदेद्वारे भारत व परदेशांत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, याच उपक्रमाअंतर्गत म्युझिकल बॅन्डचे आयोजन करण्यात आले असल्याचे ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ.प्रवीण भोळे यांनी सांगितले.
हा कार्यक्रम संगीत रसिकांसाठी खुला असून विनामूल्य आहे.
‘ला कॅरिसाल्व्हे’ हा डॉमिनिकन रिपब्लिकच्या परंपरेतून निर्माण झालेला संगीत वाद्यवृंद आहे. साल्व्ह संगीत प्रकारात अनेक आफ्रिकन आणि टायनो वाद्ये व गाण्यांचा समावेश आहे.
साल्व्ह परंपरेची थेट वंशज असलेली कॅरिडाड सेवेरिनो ही या संगीत समूहातील प्रमुख गायिका आहे. रॅमोन एव्हारिस्टो मोरेनो मर्सिडेस, योमायरा मोरेनो रोझारिओ, पेट्रोनिला क्लाउडिओ डेल रोझारिओ, फिलिसिटो मोरेनो सेप्टीमो, योहेन्नी एन्रिक ॲग्रेमॉन्ट यांचा वाद्यवृदांत समावेश आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com