‘Rice Festival’ at Zilla Parishad on 12th December
१२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत ‘तांदूळ महोत्सव’
पुणे : ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणेमार्फत १२ डिसेंबर २०२२ रोजी तांदूळ महोत्सव नवीन जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या महोत्सवात जिल्ह्यातील वेल्हा, मुळशी, मावळ, आंबेगाव, भोर, हवेली, खेड, पुरंदर व जुन्नर या तालुक्यातील महिला स्वयंसहाय्यता समुह सहभागी होणार आहेत.
यामध्ये पुणेकरांना अस्सल इंद्रायणी सेंद्रिय तांदुळ आणि त्याचबरोबर कोलम, वाडा कोलम, आंबेमोहर, काळा तांदुळ, बासमती स्थानिक वाणाचा दप्तरी आदी विविध प्रकारचा तांदुळ खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहेत.
सर्व पुणेकर नागरिक तसेच सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तांदुळ महोत्सवास भरघोस प्रतीसाद देत खेरदी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com