बांग्लादेश विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा दणदणीत विजय

Cricket-Image

India’s resounding victory in the final match of the ODI cricket series against Bangladesh

बांग्लादेश विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय

बांग्लादेशवर २२७ धावांनी विजय

चितगाव : भारत आणि बांग्लादेश यांच्यातल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतानं बांग्लादेशवर २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Cricket-Image
Image Source Pixabay.com

चितगावच्या झहूर अहमद चौधरी स्टेडियम मध्ये हा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर ईशान किशनच्या १३१ चेंडूत २१० तर विराट कोहलीच्या ९१ चेंडूत ११३ धावांच्या बळावर भारतानं बांग्लादेशसमोर विजयासाठी ४१० धावांचं आव्हान ठेवलं होत.

या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी २९० धावांची भागीदारी केली. मात्र,भारतानं दिलेल्या या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव केवळ ३४ षटकांत १८२ धावांत आटोपला. तीन सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन सामने जिंकत बांग्लादेशनं याआधीच ही एकदिवसीय मालिका जिंकली आहे.

इशान किशनने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय आणि नववा फलंदाज बनून इतिहास रचला.
रोहित शर्माने तीन द्विशतके झळकावली आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनीही वनडेत द्विशतके झळकावली आहेत.

या एकदिवसीय मालिकेनंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना १४ डिसेंबर पासून चटगावमधील झहूर अहमद चौधरी स्टेडियम इथं तर दुसरा कसोटी सामना २२ डिसेंबर पासून ढाका इथं शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *