60 per cent increase in subsidy for government-approved public libraries
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ
वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी अनुदानात वाढ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ करून वाचनसंस्कृतीला बळ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या वाढीमुळे 66 कोटी 49 लाख इतका वित्तीय भार पडेल. या निधीचा लाभ राज्यातील सुमारे 12 हजार ग्रंथालयांना होणार आहे.
जिल्हा व तालुका स्तरावरील अ आणि ब तसेच क आणि ड ग्रंथालयाना याचा लाभ मिळेल. वाढणारी महागाई आणि वाचन साहित्याच्या वाढत्या किंमती यामुळे ग्रंथालयांकडून या संदर्भात वाढती मागणी वारंवार होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com