67 per cent increase in the number of medical colleges in the country in the last 8 years
गेल्या 8 वर्षांत देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 67 टक्क्यांनी वाढ
- वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 67% वाढ होऊन त्या 387 वरून 648
- एमबीबीएसच्या जागांमध्ये 87% वाढ होऊन 51348 वरून 96077
- पीजीच्या जागांमध्ये 105% वाढ होऊन 31185 वरून 64059
नवी दिल्ली : देशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या गेल्या आठ वर्षांमध्ये 67 टक्के ने वाढली आहे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी संसदेत दिली.
देशात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या एकूण 96,077 जागा उपलब्ध असून त्यापैकी 51,712 जागा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि 44365 जागा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहेत.
देशात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) पीजी अभ्यासक्रमाच्या 49,790 जागा उपलब्ध असून, त्यापैकी 30,384 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि 19,406 खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहेत.
तसेच डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड (डीएनबी) / फेलोशिप ऑफ नॅशनल बोर्डच्या (एफएनबी) पीजी अभ्यासक्रमाच्या 12,648 जागा उपलब्ध असून, त्यापैकी 4185 जागा सरकारी संस्थांमध्ये आणि 8463 खाजगी संस्थांमध्ये आहेत. त्याव्यतिरिक्त, कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (सीपीएस) मध्ये पद्व्युत्तर अभ्यासक्रमाच्या 1621 जागा आहेत.
नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी सरकार केंद्रीय क्षेत्र परियोजना राबवत आहे. या अंतर्गत नवीन एम्सची उभारणी होत असून 22 एम्सना मंजूरी मिळाली आहे आणि त्यातील 19 एम्समध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू झाले आहेत अशी माहितीही पवार यांनी दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com