By 2030, 14 crore middle-income families will be included in the economy – Nirmala Sitharaman
२०३० पर्यंत १४ कोटी मध्यम उत्पन्न कुटुंबे अर्थव्यवस्थेमधे समाविष्ट केली जाणार – निर्मला सितारामन
नवी दिल्ली : २०३० पर्यंत सुमारे १४ कोटी मध्यम उत्पन्न गटातले कुटुंबांचा अर्थव्यवस्थेत समावेश केला जाईल, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी आज दिली . नवी दिल्ली येथे ९५ व्या FICCI इंडिया वार्षिक अधिवेशनात त्या बोलत होत्या.
जागतिक आर्थिक व्यासपीठाच्या डेटाचा हवाला देत त्या म्हणाल्या की, 2030 पर्यंत सुमारे ४ कोटी उच्च निव्वळ वैयक्तिक उत्पन्न कुटुंबे देखील अर्थव्यवस्थेशी जोडली जातील.
येत्या काही वर्षांत भारताची मागणी किती वेगानं निर्माण करेल याचं हे उदाहरण असल्याचं, सीतारामन म्हणाल्या.
सरकार तंत्रज्ञानाच्या वापरासाठी एक मजबूत चौकट प्रदान करत आहे, जेणेकरून व्यापार आणि उत्पादक समुदाय कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योग संस्थांनी बँकिंग, आरोग्य, शिक्षण आणि इतर क्षेत्रातल्या भारताच्या कामगिरीचं प्रदर्शन करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
सुश्री सीतारामन यांनी भर दिला की सरकार आगामी G20 शिखर परिषदेत ते प्रदर्शित करण्यासाठी निश्चितपणे प्रत्येक संधीचा वापर करेल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com