Priya Patil of Kolhapur is the Goodwill Ambassador of the State
कोल्हापूरची प्रिया पाटील राज्याची सदिच्छा दूत
मुंबई : राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये युवकांना सहभागी करण्यासाठी आणि शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाची प्रिया पाटील यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे यांनी प्रिया पाटील यांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने आयोजित करणे, विद्यार्थी व युवकांशी संवाद साधणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमार्फत शासनाच्या विविध योजना, उपक्रम, उद्दष्ट्यिे साध्य करण्याचे काम सदिच्छादूत म्हणून प्रिया पाटील करणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर येथे बी.एस्सी.च्या प्रथम वर्षात प्रिया पाटील शिकत आहेत. कोरोना काळात प्रिया पाटील यांनी तीनशेहून अधिक मृतदेहावर अत्यंसंस्कार केले. तिच्या या सामाजिक कार्याची दखल शासनाने घेतली आहे. तिचे समाजाप्रती असेलेली कर्तव्याची भावना आणि तिचे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com