Congress led opposition stage walk out from Rajya Sabha demanding discussion over India- China border issue
भारत-चीन सीमा प्रश्नावर चर्चेची मागणी करत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी राज्यसभेत सभात्याग केला
नवी दिल्ली: भारत-चीन सीमा प्रश्नावर चर्चेची मागणी करत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी आज राज्यसभेत सभात्याग केला. सकाळी कामकाज सुरु
झाल्यावर, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष सदस्यांनी या स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, हा प्रस्ताव सभागृहाच्या नियमांशी सुसंगत नसल्याचं सांगत, सभापती जगदीप धनखड यांनी तो फेटाळून लावला. यावर उत्तर देताना विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, अध्यक्षांकडे कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचा अधिकार आहे.
श्री धनखड म्हणाले की या महिन्याच्या सुरुवातीला, त्यांनी सभागृहाच्या नियम 267 अंतर्गत नोटिसांबद्दल स्पष्टपणे निर्णय दिले आहेत. मात्र, एकाही नोटीसने विहित नियमांचे पालन केलेले नाही. त्यांनी असेही अधोरेखित केले की नियम 267 हा अत्यंत गंभीर सूचना आहे जो असाधारण परिस्थितीत वापरला जातो. श्री. धनखड म्हणाले की, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ न शकल्याने सभागृहात चांगले संकेत न पाठवल्याने या विषयावर गेल्या काही दिवसांत व्यत्यय आला.
चीनची घुसखोरी हा अत्यंत गंभीर मुद्दा असून, त्यावर सदनामध्ये चर्चा व्हायलाच हवी, असं ते म्हणाले. खर्गे यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांवर सभागृह नेते पियुष गोयल यांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चेची परवानगी न दिल्याबद्दल निषेध नोंदवत काँग्रेस, डीएमके, डावा पक्ष, टीएमसी, राजद, एसपी,आप आणि अन्य विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com